Virat Kohli, Rohit Sharma And Rishabh Pant (Photo Credit - X)

मुंबई: ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने (Nathan Lyon) आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 (Border-Gavaskar Trophy 2024)आधी भारतीय संघातील तीन धोकादायक खेळाडूंबद्दल उघडपणे बोलले आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत लियॉनने सांगितले की, भारतीय संघ खूप मजबूत आणि आव्हानात्मक आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकतात यावर त्याने भर दिला. (हे देखील वाचा: Rohit Sharma Records: बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा करु शकतो मोठा पराक्रम, WTC मध्ये 10 शतक झळकवणारा ठरु शकतो पहिला भारतीय फलंदाज)

'यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलही भारतीय संघात...'

नॅथन लियॉन पुढे म्हणाला, "या तिन्ही खेळाडूंना नियंत्रणात ठेवणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. याशिवाय युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल हे भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत, जे मोठा प्रभाव पाडू शकतात. आम्हाला या तिन्ही खेळाडूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या फलंदाजीबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.

नॅथन लायननेही भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक 

नॅथन लायननेही भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले आणि सांगितले की, भारतीय गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगली रणनीती बनवावी लागेल. तो म्हणाला, "भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि आमच्या फलंदाजांना त्यांचा सामना करणे सोपे जाणार नाही. आम्हाला भारतीय गोलंदाजांविरुद्ध संयमाने खेळावे लागेल."

नॅथन लियॉन रचू शकतो इतिहास 

नॅथन लायन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने आतापर्यंत 187 विकेट्स घेतल्या आहेत. लियॉनकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे, कारण आणखी 13 विकेट्स घेऊन तो WTC मध्ये 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज बनू शकतो. या विक्रमामुळे तो जगातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल.