Kambala शर्यतीती आठवड्यातच मोडला श्रीनिवास गौडा यांचा रेकॉर्ड, निशांत शेट्टी ने 9.51 सेकंदात गाठले 100 मीटर अंतर (Video)
श्रीनिवास गौडा (Photo Credits: Twitter)

केवळ 9.55 सेकंदात कंबला शर्यतीत 100 मीटर अंतर गाठणारा श्रीनिवास गौडा (Srinivas Gowda) याचा विक्रम आठवडाभर देखील टिकू शकला नाही. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, निशांत शेट्टी (Nishant Shetty) नावाचं एका कंबाला धावपटूने म्हशींसह 9.51 सेकंदात 100 मीटर धावत गौडाचा विक्रम मोडला आहे. निशांतने 13.68 सेकंदात 143 मीटर अंतर पूर्ण केले. त्याची कामगिरी गौडापेक्षा 4 सेकंद चांगली ठरली. एकट्या 100 मीटर शर्यतीची नोंद करण्याचा विश्वविक्रम जगातील सर्वात वेगवान आणि जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट (Usain Bolt) याच्या नावावर आहे, ज्याने 100 मीटर 9.58 सेकंदात पूर्ण केले होते. बाजागोली जोगीबेटू येथील निशांतने वेनूरमधील सोरिया-चंद्र जोडुकरे कंबाला (Kambala) येथे 9.51 सेकंदात 100 मीटर अंतराचा एक नवीन विक्रम स्थापित केला. अलीकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पाच्या हस्ते श्रीनिवास गौडा यांचा सत्कार करण्यात आला आणि त्याच्या कामगिरीबद्दल सरकारने त्यासाठी 3 लाख रुपये पुरस्कार म्हणून मंजूर केले. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही कंबाला धावपटू गौडाबद्दल ट्विट केले आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे त्यांना प्रशिक्षण दिले जाण्याचेही म्हटले. (भारताच्या श्रीनिवास गौडाने म्हशींच्या शर्यतीत केली आश्चर्यकारक कामगिरी, 9.55 सेकंदात पूर्ण केले 100 मीटर अंतर, यूजर्स करताहेत उसैन बोल्ट शी तुलना)

गौडांपेक्षा निशांतने कमी वेळात शर्यत पूर्ण केली असल्याने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियादेखील त्याला प्रशिक्षण देते की नाही ते पाहावे लागेल. गेल्या आठवड्यात म्हशीबरोबर धावण्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर गौडाने भारताच्या क्रीडा क्षेत्रातवादळ निर्माण केले. गौडाने 100 मीटर अंतर केवळ 9.55 सेकंदात पूर्ण केले. यानंतर, रिजीजूंनी एसएआयच्या प्रशिक्षकांना बेंगळुरूमध्ये चाचणी करण्यास सांगितले. पण गौडाने ट्रॅकवर शर्यतीचा अनुभव नसल्याचे दाखवून चाचणीमध्ये भाग घेण्यास नकार दिला.

गौडाच्या बेंगळुरू प्रवासाची सर्व व्यवस्था क्रीडामंत्र्यांनी केली होती आणि दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्यानंतर त्याची चाचणी करवण्यात येणार होती. मात्र, गौडाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाचणीला न जाण्याचा निर्णय घेतला.