Jay Shah (Photo Credit - Twitter)

Jay Shah ICC chairman: बीसीसीआयचे निवर्तमान सचिव जय शाह (Jay Shah) यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अशा प्रकारे जागतिक संघटनेचे नेतृत्व करणारे ते पाचवे भारतीय ठरले. गेल्या पाच वर्षांपासून बीसीसीआयचे (BCCI) सचिव असलेले 36 वर्षीय जय शाह, आयसीसीच्या संचालक मंडळाची एकमताने निवड झाली आणि न्यूझीलंडचे वकील ग्रेग बार्कले यांची जागा घेतली, ज्यांना सलग तिसऱ्यांदा या पदावर राहायचे नव्हते. जय शाह यांच्या आधी, उद्योगपती दिवंगत जगमोहन दालमिया, राजकारणी शरद पवार, वकील शशांक मनोहर आणि उद्योगपती एन श्रीनिवासन या सर्वांनी जागतिक क्रिकेट संघटनेचे नेतृत्व केले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हे पहिले आव्हान!

आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह यांच्यासमोर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यशस्वी आयोजन करणे हे सर्वात मोठे आव्हान असेल, कारण आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'हायब्रिड मॉडेल' लागू करण्यासाठी स्वीकारार्ह उपाय शोधणे आवश्यक आहे, जे मूळत: पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन आहे भविष्यातील सर्व आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) स्पर्धा या प्रणालीवर आधारित असतील असे बोर्डाने मान्य केले तरच ते 'हायब्रीड मॉडेल'वर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन स्वीकारतील असे नक्वी यांनी म्हटले आहे. आणि पाकिस्तान आपले सामने खेळायला भारतात जाणार नाही.

हे देखील वाचा: Joe Root Surpasses Sachin Tendulkar Record: जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम; कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ विक्रम करणार ठरला पहिला खेळाडू

जय शहा यांची कारकीर्द

जय शाहच्या कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून झाली. 2019 मध्ये, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वात तरुण सचिव झाले, वयाच्या 36 व्या वर्षी त्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारले. आयसीसी चेअरमन बनणारे ते सर्वात तरुण आहेत. याशिवाय शाह यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.