Photo Credit- X

Joe Root Surpasses Sachin Tendulkar’s world record: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रूट (Joe Root) याने शानदार खेळी साकारत सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकत विश्वविक्रम केला आहे. एकाच सामन्यात त्याने तीन महान खेळाडूंना मागे टाकण्याचा पराक्रम केला. तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला . त्याने न्यूझीलंडविरुद्ध 15 चेंडूत 23 धावांची तुफानी खेळी खेळली. (हेही वाचा:Zimbabwe vs Pakistan, 1st T20I Match 2024 Live Streaming In India: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना; थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्याल? )

रूट याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. चौथ्या डावातील त्याच्या कसोटी धावांची संख्या 1607 होती, जी आता 1630 झाली आहे. या सामन्यात त्याने पाच धावा करून ग्रॅम स्मिथसह ॲलिस्टर कुकला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमधील या कामगिरीची नोंद सचिन तेंडुलकरच्या नावावर होती चौथ्या डावात सचिनने 1625 धावा केल्या होत्या.(हेही वाचा:IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची आतापर्यंतची कशी आहे कामगिरी? वाचा एका क्लिकवर 'हिटमॅन'ची आकडेवारी )

प्रथम फलंदाजी करताना माजी कर्णधार केन विल्यमसनच्या 93 धावांच्या जोरावर किवी संघाचा डाव 348 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 499 धावा केल्या आणि 151 धावांची आघाडी घेतली. हॅरी ब्रूकने 171 धावांची जबरदस्त खेळी करत न्यूझीलंडची धावसंख्या 254 पर्यंत आणली.