
Bumrah T20 Wicket Record: आयपीएल 2025 च्या 41 व्या सामन्यात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) एक विशेष कामगिरी केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-20 क्रिकेटमध्ये त्याचे 300 विकेट्स पूर्ण केले. तसेच, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-20 क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना बुमराहने ही कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन त्याच्या टी 20 क्रिकेट कारकिर्दीतील 300 वा बळी ठरला.
दुसरा वेगवान गोलंदाज बनला
भारताकडून हा आकडा गाठणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज बनला आहे. या यादीत युजवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. पियुष चावला दुसऱ्या आणि भुवनेश्वर कुमार तिसऱ्या स्थानावर आहे. एकूणच, बुमराह चौथ्या स्थानावर आहे. बुमराहने हैदराबाद विरुद्ध 4 षटकांत 39 धावा देऊन एक बळी घेतला. तर बोल्टने चार बळी घेतले.
टी-20 मध्ये 300 बळी घेणारा भारतीय गोलंदाज
373 - युजवेंद्र चहल
319 - पियुष चावला
318 - भुवनेश्वर
315 - रवी अश्विन
300 - जसप्रीत बुमराह
285 - अमित मिश्रा
मुंबईसाठी सर्वाधिक बळी
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा बुमराह पहिला भारतीय ठरला आहे. त्याने लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी एकूण 170 बळी घेतले आहेत. हरभजन सिंगने एमआयसाठी 127 बळी घेतले आहेत.
आयपीएलमध्ये एमआयसाठी सर्वाधिक बळी
170 - जसप्रीत बुमराह
170 - लसिथ मलिंगा
127 - हरभजन सिंग
71 - एम मॅकक्लेघन