इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Legue) मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या चाहत्यांसाठी सतत आपली मुलगी समायराचे (Samaira) फोटोज शेअर करत असतो. मुंबईला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनवण्यामागे रोहितचा मोठा वाटा आहे. यावर्षी झालेल्या टूर्नामेंटमध्ये रोहितची लेकसमायरा पहिल्यांदा वडिलांना स्टँड्समधून चिअर करताना दिसली. पण, मुंबई इंडियन्स संघाचा पारंपरिक विरोधी संघ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या मते, समायरा मुंबईची नाही तर महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघाची फॅन आहे. रोहितने नुकतंच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पत्नी रितिका आणि लेक समायरा सोबतच एक गोंडस फोटो शेअर केला. समायराने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फोटोला चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, रोहितची लेक आता सीएसकेची फॅन झाली आहे. (IND vs BAN T20I: बांग्लादेश टी-20, टेस्ट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; विराट कोहली याला टी-20 साठी विश्रांती, तर रोहित शर्मा यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी)
सीएसकेने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर यूजर्सने रोहित आणि मुंबई इंडियन्सला टॅग करून त्यांना याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला. पहा सोशल मीडियावरील समायराचा 'तो' गोंडस फोटो:
Defining Ambush Marketing in style. Both the hashtags right there! 😻 #WhistlePodu #Yellove 🦁💛 https://t.co/SBCD2Ebqtk
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 27, 2019
नीता अंबानीच्या मालकीचा संघ मुंबई इंडियन्स सुरुवातीला संघर्ष करताना दिसला. पण, रोहितच्या नेतृत्वात संघाला यश मिळाले आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई संघाने 4 वेळा आयपीएलचे (IPL) जेतेपद मिळवले आहे, तर धोनीच्या नेतृत्वातील सीएसके संघ 3 वेळा विजयी झाला आहे. आयपीएलमधील रोहितच्या नेतृत्वाकडे पाहता त्याला भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार बनवावा अशी मागणी केली जात होती. रोहितकडे सध्या या क्षणी आनंदी होण्याचे पुरेसे कारण आहे. विश्वचषकमधील प्रभावी कामगिरीनंतर त्याला पहिल्यांदा भारताच्या टेस्ट संघात सलामीला येण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या टेस्ट मालिकेतून रोहितने सलामी फलंदाज म्हणून टेस्टमध्ये शानदार कामगिरी केली. आफ्रिकाविरुद्ध रोहितने 4 डावात 529 धावा केल्या. यात दोन शतक आणि एक दुहेरी शतकाचा समावेश आहे.