बांग्लादेश (Bangladesh) संघाविरुद्ध पुढील महिन्यांपासून सुरु होणाऱ्याटी-20 आणि टेस्ट मालिकेसाठी भारतीय सांघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. भारत (India) आणि बांग्लादेश यांच्यात सुरुवातीला 3 सामन्यांची टी-20 आणि नंतर 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. भारताच्या टी-20 संघात मोठा बदल करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे, विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच्याशिवाय संजू सॅमसन (Sanju Samson), शिवम दुबे यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संघातून बाहेर झालेल्या के एल राहुल यालाही स्थान मिळाले आहे. राहुलने नुकत्याच विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केले होता आणि म्हणून त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. टी -20 मालिका 3 नोव्हेंबरपासून दिल्लीत सुरू होईल. दुसरा सामना नोव्हेंबरला राजकोट आणि तिसरा सामना 10 नोव्हेंबरला नागपुरात खेळला जाईल. दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून इंदूर येथे सुरू होणार असून ही जागतिक कसोटी स्पर्धेचा भाग आहे. दुसरी आणि शेवटची कसोटी 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळली जाईल. (IND vs BAN T20I 2019 : टी-20 मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, बंदी घातलेल्या 'या' खेळाडूचे 3 वर्षानंतर संघात पुनरागमन)
भारतीय संघात शार्दूल ठाकूर यालाही संधी मिळाली आहे. तर विश्वचषकनंतर एकही सामना न खेळलेल्या युझवेन्द्र चहल याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, टेस्ट संघात विराट कर्णधार म्हणून कायम आहे. भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळलेल्या टेस्ट संघात कोणताही बदल नाही केला आहे.
असा आहे भारताचा टी-20 आणि टेस्ट संघ:
टी-20: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, संजू सॅमसन, रिषभ पंत, के एल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल.
टेस्ट: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल आणि रिषभ पंत.