भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: Getty)

IND vs AUS 1st ODI 2020 Live Telecast on DD Sports on DD Free Dish: कोरोना व्हायरस लॉकडाउननंतर पहिल्यांदाच भारतीय संघ (Indian Team) सिडनी (Sydney) येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मालिकेच्या सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून (27 नोव्हेंबर) डे-नाईट सामन्याने सुरु होईल. सोनी पिक्चर्स नेटवर्क 2020-21 ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे अधिकृत प्रसारक आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट व ऑनलाईन स्ट्रीमिंगही करेल. पण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स, डीडी नॅशनल, डीडी फ्री डिश (DD Free Dish) वर किंवा दूरदर्शन नेटवर्क वर उपलब्ध असेल का? इथे जाणून घ्या तुमच्या  प्रश्नांची उत्तरं. टीव्हीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. (IND vs AUS 1st ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि TV Telecast ची संपूर्ण माहिती)

आपणास माहित आहे की सोनी सिक्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 लाईव्ह प्रसारण उपलब्ध असेल. तथापि, हे चॅनेल डीडी फ्री डिशवर उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच लाईव्ह रेडिओ कमेंटरीसाठी चाहते डीडी स्पोर्ट्स, डीडी नॅशनल, प्रसार भारती आणि आकाशवाणीवर मॅच लाइव्ह टेलिकास्ट शोधत आहेत. आणि चाहत्यांसाठी एक चांगली बातमी म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया लाईव्ह टेलीकास्ट डीडी स्पोर्ट्सवर उपलब्ध असेल. फ्री टू एअर चॅनेलला सामन्यात लाईव्ह प्रसारण हक्क देण्यात आले आहेत. मात्र, डीडी नॅशनलवर लाईव्ह प्रसारण उपलब्ध नसेल. लक्षात घेण्यासारखे म्हणजे लाईव्ह टेलीकास्ट डीडी स्पोर्ट्सवर फक्त डीडी फ्री डिश आणि डीटीटी (डिजिटल टेरेशियल टेलिव्हिजन) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. DTH प्लॅटफॉर्मवर सोनी चॅनेलवर लाईव्ह प्रसारण चाहत्यांना पाहायला मिळेल.

दुसरीकडे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेची लाईव्ह कमेंटरी रेडिओवरही उपलब्ध होईल. आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ) लाईव्ह कमेंटरी करेल, तर प्रसार भारती स्पोर्ट्स ’यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम भाष्य उपलब्ध असेल.