Photo Credit- Instagram

Irfan Pathan Commentary IPL 2025:  काही खेळाडूंवर टीका केल्याने इरफान पठाणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळण्यात आले. त्यामुळे भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) आयपीएल 2025 च्या (IPL 2025) समालोचन पॅनेलचा भाग नाही. याचदरम्यान इरफान पठाणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इरफान पठाण भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर टीका करताना दिसत आहे. नेटकरी इरफान पठाण खेळातील राजकारणाचा बळी ठरतोय का? असा प्रश्न देखील विचारत आहेत. व्हिडीओत बोलताना इरफान पठाणने कठोर शब्दात टीका केल्याचं दिसत आहे. काहींनी त्याच्या वक्तव्याच समर्थ केल आहे. तर काहींनी त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. TATA IPL Points Table 2025 Update: पंजाब किंग्जकडून चेन्नई सुपर किंग्जचा पराभव; पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब चौथ्य स्थानी

इरफान पठाण काय म्हणाला?

सोशल मीडियावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी संबंधित एक व्हिडीओ क्लिप शेअर केली गेली आहे. या व्हिडीओमध्ये इरफान पठाण विराट कोहलीवर टीका करताना दिसतोय. विराट कोहली घरगुती स्पर्धेमध्ये खेळत नाही. असे इरफानच्या बोलण्याचा उद्देश होता. विराट शेवटचा १० वर्षांपूर्वी  घरगुती स्पर्धा खेळला होता. त्यावर इरफानने लक्ष वेधले. त्याशिवाय, त्याची खेळण्याची सरासरी फार कमी आहे. याकडेही त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.  विराटची सरासरी 15 इतकी होती. मग, वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात हवेत का? याचा विचार व्हायला हवा. याऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला वारंवार संधी दिली तर तो सुद्धा 25-30 ची सरासरी देईल, असं इरफान पठाण या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय.