Ireland National Cricket Team vs South Africa National Cricket Team 2nd T20I Match Scorecard: आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा टी 20 सामना 29 सप्टेंबर रोजी खेळला गेला. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवला गेला. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. यासह आयरिश संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
तत्पूर्वी दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयरिश संघाची सुरुवात स्फोटक झाली. पहिल्या विकेटसाठी पॉल स्टर्लिंग आणि रॉस एडेअर यांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 78 चेंडूत 137 धावा केल्या. आयरिश संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 195 धावा केल्या. रॉस एडेअरने आयर्लंडकडून सर्वाधिक 100 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान रॉस एडेअरने 58 चेंडूत नऊ षटकार आणि पाच चौकार लगावले. रॉस एडेअरशिवाय पॉल स्टर्लिंगने 52 धावा केल्या.
पॅट्रिक क्रुगरने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून विआन मुल्डरने सर्वाधिक दोन बळी घेतले. विआन मुल्डरशिवाय लिझाद विल्यम्स, लुंगी एनगिडी, पॅट्रिक क्रुगर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 196 धावा करायच्या होत्या.
हे आहे IRE विरुद्ध SA सामन्याचे स्कोअरकार्ड:
HISTORY AT ABU DHABI...!!!!
IRELAND HAS BEATEN SOUTH AFRICA FOR THE FIRST TIME IN T20I HISTORY 👊🥶 pic.twitter.com/L5nLZdyU3q
— Johns. (@CricCrazyJohns) September 29, 2024
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी रायन रिकेल्टन आणि रीझा हेंड्रिक्स यांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 33 चेंडूत 50 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत नऊ विकेट गमावून केवळ 185 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मॅथ्यू ब्रिट्झकेने सर्वाधिक नाबाद ५१ धावांची खेळी खेळली. मॅथ्यू ब्रित्झकेशिवाय रीझा हेंड्रिक्सने 51 धावा केल्या. तर आयर्लंडकडून मार्क एडेअरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क एडेअरशिवाय ग्रॅहम ह्यूमने तीन बळी घेतले.