Jos Buttler (Photo Credit - Twitter)

आयपीएल 2023 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक सामना अप्रतिम होत आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात काही अप्रतिम शॉट्स पाहायला मिळाले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर जोस बटलरने (jos Buttler) आयपीएलमधील सर्वात लांब षटकार ठोकला आहे. बटलरने 112 मीटरमध्ये षटकार ठोकला. त्याचा हा षटकार देखील आयपीएल 2023 मधील दुसरा सर्वात लांब षटकार होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकाराचा विक्रम अॅल्बी मॉर्केलच्या नावावर आहे, ज्याने 2008 च्या पहिल्या सत्रात सीएसकेसाठी 125 मीटरचा षटकार मारला होता. त्याच्यानंतर प्रवीण कुमारने 2011 मध्ये 124 मीटरमध्ये षटकार मारला होता. (हे देखील वाचा: KL Rahul Fined: लखनौने सामना जिंकुनही केएल राहुलला 'मोठी शिक्षा', बसला लाखोंचा दंड)

आयपीएल 2023 मधील 5 सर्वात लांब षटकार

फाफ डू प्लेसिस - 112 मीटर

जोस बटलर - 112 मी

शिवम दुबे - 111 मीटर

केएल राहुल - 102 मीटर

शिवम दुबे - 102 मीटर

आयपीएल इतिहासातील 10 सर्वात लांब षटकार

अल्बी मॉर्केल - 125 मी

प्रवीण कुमार - 124 मी

अॅडम गिलख्रिस्ट - 122 मीटर

रॉबिन उथप्पा - 120 मीटर

ख्रिस गेल - 119 मीटर

युवराज सिंग - 119 मीटर

रॉस टेलर - 119 मीटर

बेन कटिंग - 117 मीटर

गौतम गंभीर - 117 मीटर

लियाम लिव्हिंगस्टोन - 117 मीटर