MI vs CSK, IPL 2019 (Photo Credits-File Photo)

IPL Final 2019: इंडियन प्रिमियर लीगच्या 12 व्या सीझनमधील आज अंतिम सामना खेळवला जाणार असून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये लढत रंगणार आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर आजचा सामना पार पडणार आहे. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यासाठी एकत्र खेळताना दिसून येणार आहेत. तसेच चौथ्यांदा आयपीएलच्या पुरस्काराचे दावेदार कोण होणार हे सुद्धा पाहणे लक्षवेधी असणार आहे.

दोन्ही संघातील झालेल्या गेल्यावेळच्या अंतिम सामन्यात मुंबई संघाचा विजय झाला आहे. तर चेन्नईच्या संघाला एकदा विजय मिळवता आला आहे. तर आजचा सामना तुम्हाला Hotstar Online वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.तसेच सामन्याचा लाइव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संभावित खेळाडूंचा संघ-

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चाहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मैक्लेनघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह.

(IPL 2019 Final: आजच्या आयपीएल सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला मिळणार 20 कोटी रुपयांचे बक्षिस तर उपविजेत्या संघाला मिळणार 12.5 कोटी)

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार और विकेटकीपर), अंबाती रायडू, शेन वाटसन, सुरेश रैना, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड़, मिशेल सैंटनर, डेविड विली, सैम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा