IPL 2020 आधी विराट कोहली च्या रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ला मोठा झटका, 2019 मध्ये ब्रँड व्हॅल्यू त 8 टक्क्यांनी घट
विराट कोहली (Photo Credit: PTI)

जगभरातील स्टार क्रिकेटरांनी सजलेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (Indian Premier League) एक चांगली बातमी आहे. इंग्लंडमध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा असूनही, लीगचे ब्रँड व्हॅल्यू वर्ष 2019 मध्ये 7 टक्क्यांनी वाढले आहे. आता आयपीएलचे ब्रँड व्हॅल्यू 4.87 ट्रिलियन पर्यंत वाढले आहे. पहिल्या लीगचे ब्रँड व्हॅल्यू 4.49 ट्रिलियन होते. न्यूयॉर्कच्या कॉर्पोरेट फायनान्स अ‍ॅडव्हायझरी फर्म डफ अँड फेल्प्सच्या अहवालानुसार, आयपीएलमधील जाहिरातदार, ब्रॉडकास्टर, प्रायोजक, भागीदार आणि दर्शकांचा विश्वास बनून राहिला आहे शिवाय, यात सातत्याने वाढदेखील होत आहे. जाहिरातींमधून मिळणार्‍या उत्पन्नात 20 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात 18.6 दशलक्ष लोकांनी पाहिले होते. (IPL 2020: माईक हेसन RCB क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक, सायमन कॅटिच हेड कोच; गॅरी कर्स्टन-आशिष नेहरा यांची हकालपट्टी)

मात्र, मुंबईत प्रसिद्ध झालेल्या या अहवालात हे स्पष्ट केले गेले आहे की, आयपीएल 2018 मध्ये लीगची ब्रॅण्ड व्हॅल्यू 19 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालानुसार, विराट कोहली याच्या नेतृत्वात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalor) आणि शाहरुख खान यांच्या सहकार्याने बनलेल्या कोलकाता नाईट्रिडर्सचे (Kolkata Knight Riders) ब्रँड व्हॅल्यूमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी खूपच खराब होती. या दोन संघांचे ब्रँड व्हॅल्यू सुमारे 8-8 टक्क्यांनी कमी झाले आहे. आरसीबीचे मूल्य 595 कोटी आहे, तर केकेआरची ब्रँड व्हॅल्यू 630 कोटी पर्यंत पोहचली आहे. अशा परिस्थितीत विराटसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे कारण त्याची लोकप्रियता आणि कामगिरीसुद्धा संघाचा आलेख वाढवू शकले नाही.

आयपीएल ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्टनुसार उद्योगपती मुकेश अंबानी पत्नी नीता आणि मुलगा आकाश यांच्या मालकीची टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ची टीम अव्वल स्थानी आहे. संघाची ब्रँड व्हॅल्यू 809 कोटी आहे. मुंबईचा संघ सलग चौथ्यांदा अव्वल क्रमांकावर बनून राहिला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपरकिंग्सची (Chennai Super Kings) ब्रॅण्ड व्हॅल्यू प्रचंड वाढली आहे. 13.1टक्क्यांच्या वाढीसह संघाची ब्रँड व्हॅल्यू आता 732 कोटींवर पोहचली आहे. आयपीएलची सर्वात युवा फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) ब्रँड व्हॅल्यू काही काळ स्थिर राहिली आहे, परंतु दिल्लीच्या (Delhi) संघाने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचे ब्रँड व्हॅल्यूत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्लीच्या ब्रँड व्हॅल्यूत 8.9 टक्क्याने वाढ होत मागील वर्षी 343 कोटी रुपयांवरून वाढून 2019 मध्ये 374 कोटी रुपये झाली आहेत.