IPL 2022: ‘फिनिशर’ MS Dhoni च्या वादळापुढे मुंबई भुईसपाट, IPL मध्ये सर्वात खराब सुरुवात करणारा मुंबई इंडियन आठवा संघ; पाहा अन्य ते कोण आहेत
एमएस धोनी (Photo Credit: PTI0

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम ‘फिनिशर’ एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या मदतीला धावला आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या आयपीएल (IPL) 2022 सामन्यात टीमला रोमहर्षक विजय मिळवून दिला. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी, मुंबई इंडियन्सने या मोसमात त्यांच्या पराभवाची मालिका सुरूच ठेवली आहे. रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई संघाला आयपीएल 2022 मध्ये सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि इतिहासातील सर्वात वाईट सुरुवात करण्याचा विक्रम निर्माण केला. चेन्नईला शेवटच्या षटकांत 17 धावांची गरज असताना धोनी पुन्हा आपल्या फिनिशरच्या भूमिकेत परतला आणि मुंबईला फक्त तीन गडी राखून पराभूत केले. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील संघाने आयपीएल 2022 मधील त्यांचा दुसरा विजय मिळवला आणि मुंबईचा संघ चालू स्पर्धेत नवीन नीचांकावर घसरला. (IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्सचा पराभवाचा सिलसिला कायम, चेन्नईच्या 3 विकेट्सने दमदार विजयामुळे ‘पलटन’साठी प्लेऑफचे दरवाजे बंद)

आयपीएलच्या एका मोसमात मुंबई इंडियन्सने सलग सात सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2014 मध्ये यापूर्वी त्यांनी सलग पाच सामने गमावले होते, परंतु मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवून मोठा उलटफेर केला होता. एकंदरीत, एकाच आयपीएल हंगामात सलग सहा किंवा त्याहून अधिक सामने गमावणारा मुंबई इंडियन्स हा सातवा संघ ठरला आहे. यापूर्वी डेक्कन चार्जर्स (2008 मध्ये 7), पंजाब किंग्ज (2015 मध्ये 7), दिल्ली कॅपिटल्स (2013, 2013 आणि 2014 मध्ये 6, 6, 9), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (6 - 2017 आणि 2019), पुणे वॉरियर्स (9 - 2012 आणि 2013), आणि केकेआर (2009 मध्ये 9) आयपीएल इतिहासात अशी नकोशी सुरुवात करणारे अन्य संघ आहेत.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याबद्दल बोलायचे तर धोनीने 28 धावांवर नाबाद राहून CSK ला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सीएसकेला अंतिम षटकात 17 धावांची गरज असताना धोनीने जयदेव उनाडकटच्या चेंडूवर एक षटकार आणि दोन चौकार मारले व मुंबई सलग सातवा पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले. सर्वाधिक 40 धावा करून अंबाती रायुडू आणि 30 धावा करणाऱ्या रॉबिन उथप्पाने महत्त्वाचे योगदान दिले, पण मोक्याच्या क्षणी एधोनीच्या खेळीने CSK ला सामन्याच्या अंतिम चेंडूवर विजय मिळवून दिला.