IPL 2022, SRH vs CSK: हैदराबादविरुद्ध रुतुराज गायकवाडची 1 नंबरी कामगिरी, सचिन तेंडुलकरच्या तेंडुलकरच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी
रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) स्टार सलामीवीर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अखेर यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) लय मिळवली आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात रुतुराजने मोठा पराक्रम केला आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमी बरोबरी केली. गायकवाड आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद 1000 धावांचा पल्ला गाठणारा वेगवान भारतीय ठरला आहे. सचिनसह आता रुतुराजने 31 डावात ही कामगिरी केली आहे. IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान एक हजारी पल्ला गाठण्याचा विक्रम शॉन मार्शच्या नवे आहे, ज्याने फक्त 21 डावात ही कमाल केली होती.

रुतुराजची एक नंबर कामगिरी