IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: राजस्थानचा बेंगलोरवर सनसनाटी विजय, फायनलमध्ये दुसऱ्यांदा धडक; जेतेपदासाठी गुजरातशी भिडणार
राजस्थान विरुद्ध बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला मिळवून दिलेल्या पकड कायम ठेवत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) 7 गडी राखून ओव्हरमध्ये पराभव केला. या एकतर्फी सामन्यात विजयासह राजस्थानने 2008 नंतर प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल्सना गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरने (Jos Buttler) 60 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी करत राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. बटलरशिवाय संजू सॅमसनने 23 आणि जयस्वालने 21 धावांचे योगदान दिले. बटलरचे आयपीएल 15 मधील हे चौथे शतक आहे. (IPL 2022: ‘जोस बटलरला माझा दुसरा पती म्हणून दत्तक घेतले’, राजस्थान क्रिकेटपटूच्या पत्नीने असे का म्हटले जाणून घ्या)

राजस्थानच्या विजयात गोलंदाजांनंतर बटलरने निर्णायक भूमिका बजवावी. प्रसिद्ध कृष्णाच्या नेतृत्वात राजस्थानने आरसीबी संघाला 157 धावांत रोखले. त्यानंतर बटलर आणि यशस्वीच्या सलामी जोडीने संघाला जबरदस्त सुरुवात करून देत टीमच्या विजयाचा पाया रचला. बटलर आणि जयस्वालमध्ये सलामीची 61 धावांची भागीदारी झाली. जयस्वाल बाद झाल्यावर बटलरने 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर कर्णधार सॅमसनसह अर्धशतकी भागीदारी करून बटलरने संघाला शंभरी पार नेली. दोघे मिळून संघाला विजयीरेष ओलांडून देतील असे दिसत होते, पण वानिंदू हसरंगाच्या फिरकीत अडकून राजस्थानचा कर्णधार स्टंप आऊट झाला. मोक्याच्या क्षणी पडिक्क्लही बाद झाला. पण बटलरने तग धरून बटलरने 59 चेंडूत शतक करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. अशाप्रकारे राजस्थानने फायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री घेतली. आरसीबीसाठी जोश हेझलवुड आणि हसरंगाने 1-1 विकेट घेतली. तथापि फलंदाजीनंतर गोलंदाजीत अपयशामुळे बेंगलोरच्या पदरी पराभव पडले.

यापूर्वी क्वालिफायर 2 च्या निर्णायक सामन्यात बेंगलोरचे धुरंधर फलंदाज रॉयल्सच्या गोलंदाजीपुढे अक्षरशः हतबल दिसले. विराट कोहली अवघ्या 7 धावाच करू शकला. तर कर्णधार डु प्लेसिसने 27 चेंडूत 25 धावा, ग्लेन मॅक्सवेलने 13 चेंडूत 24 धावांचे छोटेखानी योगदान आले. चॅलेंजर्ससाठी रजत पाटीदारने 42 चेंडूत 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्ससाठी प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तसेच ट्रेंट बोल्ट आणि रविचंद्रन अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.