IPL 2022 Retention Live Streaming Online in IST: मेगा लिलावपूर्वी इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझींद्वारे होणारे प्रक्षेपण कसे पाहावे? खेळाडूंबाबतही माहिती कुठे मिळेल? घ्या जाणून
IPL Trophy (Photo Credit : PTI)

आयपीएल 2022 (IPL 2022) फ्रँचायजीसाठी राखून ठेवलेले आणि निवडलेल्या खोळाडूंची घोषणा मंगळवारी (30 नोव्हेंबर 2021) होईल. या वेळी आयपीएल हंगामात आणखी दोन संघ प्रवेश करत असल्याने चाहते आणि क्रीडा वर्तुळात उत्साह आहे. आयपीयलचे यंदा 15 वे पर्व आहे. या पर्वादरम्यान अनेक मातब्बर खेळाडू आपल्या संघांची निवड बदलतील. तर अनेक संघ मालक खेळाडूंचीही आदलाबदल करतील. त्यामुळे सहाजिकच क्रीडा चाहत्यांना नवे फेरबदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान, IPL 2022 लिलाव लाइव्ह स्ट्रीमिंग द्वारे पाहणारे चाहते खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करु शकतात. डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडण्याची पुष्टी केली, 'ते मला कायम ठेवणार नाहीत'.

दरम्यान, या वेळी आयपीएलमध्ये बरेच बदल पाहायला मिळू शकतात. डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडण्याची पुष्टी केली आहे. तर रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली हे आपापल्या स्थानावर कायम राहण्याची शक्यता सोशल मीडियातून व्यक्त केली जात आहे. तर डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल आणि हार्दिक पंड्यासारखे तारे आयपीएल 2022 मध्ये नवे रंग भरु शकतात. (हेही वाचा, IPL 2022 Retention: फ्रँचायझींना Retained खेळाडूंसाठी मोजावी लागणार किती रक्कम, कोणाला मिळणार किती पैसे; जाणून घ्या रिटेंशनचे गणित)

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) IST (भारतीय प्रमाणवेळेनुसार) रात्री 09:30 वाजेपर्यंत त्यांच्याकडे ठेवलेल्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध करतील.

टीव्हीवर भारतात आयपीएल 2022 रिटेन्शन कोठे पाहायचे?

स्टार नेटवर्क हे इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत प्रसारक आहेत. त्यामुळे ते आयपीएल 2022 चे प्रसारण करतील. टीव्हीवर रिटेन्शनचे प्रसारण पाहण्यासाठी चाहते रात्री 09:30 पासून स्टार स्पोर्ट्स चॅनेल ट्यून करू शकतात.

भारतात आयपीएल २०२२ रिटेन्शन लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहावे?

स्टार नेटवर्क हे इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत प्रसारक आहेत आणि डिस्ने+ हॉटस्टार आयपीएल 2022 रिटेंशन स्ट्रीम करेल. आयपीएल 2022 रिटेन्शन लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहण्यासाठी चाहते Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर ट्यून करू शकतात.