IPL 2022, RCB vs GT: सलामीवीर विराट कोहली - फाफ डु प्लेसीस यांची दमदार खेळी, बेंगलोरचे आव्हान कायम;  PlayOffs च्या तोंडावर गुजरातचा दणदणीत पराभव
फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात आयपीएलचा (IPL) 67 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातने बेंगलोरपुढे 169 धावांचे आव्हान ठेवले होते, जे विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डु प्लेसिसच्या (Faf du Plessis) शतकी भागीदारीच्या जोरावर संघाने 18.4 ओव्हरमध्ये गाठले आणि प्लेऑफ फेरीच्या तोंडावर गुजरातला 8 गडी राखून धूळ चारली. गुजरातचा हा 14 सामन्यातील चौथा पराभव ठरला आहे. तर या विजयासह रॉयल चॅलेंजर्सने प्ले ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान टिकून ठेवले आणि टॉप-4 मध्ये पोहोचली आहे. ‘आर या पार’च्या सामन्यात बेंगलोरच्या विजयात मजा कर्णधार विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली. विराटने 73 धावांची खेळी केली. तर डु प्लेसिसने 44 धावा केल्या आणि ग्लेन मॅक्सवेल 40 धावा करून नाबाद राहिला. (IPL 2022 Points Table: गुजरात टायटन्सवर रॉयल चॅलेंजर्सच्या विजयाचा ‘या’ दोन संघाना बसला जोर का झटका)

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या सलामी जोडीने रॉयल चॅलेंजर्सना धमाकेदार सुरुवात करून दिली. दोंघांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली तर, पहिल्या विकेटसाठी गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. आरसीबीच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी महत्वाच्या सामन्यात संघाचा माजी कर्णधार विराटची बॅट वेळेत तळपली. विराटने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि संघाच्या विजयाचा ‘हिरो’ ठरला. बेंगलोरची सलामी जोडी राशिद खानच्या फिरकीत अडकून बाद झाली, पण तोपर्यंत संघाने सामन्यावर ताबा मिळवला होता. निर्णायक क्षणी मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाज दिनेश कार्तिकला साथीला घेत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. अशाप्रकारे प्ले ऑफसाठी आरसीबीचे आव्हान अजूनही अतूट राहिले आहे. दरम्यान बेंगलोरला अंतिम चार मधील स्थान निश्चित करण्यासाठी फक्त सामना जिंकणेच पुरेसे नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या आगामी सामन्याचा निकाल देखील त्यांच्या बाजून लागणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, यापूर्वी सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजीचा निर्णय घेतला होता, जो अखेरीस त्यांच्याच अंगी उलटला. गुजरातकडून कर्णधार हार्दिकने सर्वाधिक धावा केल्या आणि 47 चेंडूत 62 धावांची खेळी केली. गुजरातच्या आघाडीचे तीनही फलंदाजी बेंगलोरच्या भेदक माऱ्यापुढे धराशाई झाले. डेविड मिलर 34 धावा करून हार्दिकला साथ देत डाव स्थिरावला. मिलरने 25 चेंडूत 34 धावा केल्या. पण फलंदाजानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीने गुजरात संघचा घात केला.