तिलक वर्मा (Photo Credit: PTI)

‘जिथे प्रतिभेला संधी मिळते’; हे आयपीएलचे (IPL) ब्रीदवाक्य आहे आणि खरंच दरवर्षी जगातील सर्वात स्पर्धात्मक टी-20 लीगमध्ये विविध देशांतील अनेक प्रतिभावान तरुण खेळाडूं उदयास येतात. यंदा स्पर्धेत दोन नवीन संघांची भर पडल्याने युवा खेळाडूंच्या संख्येत आणखी भर पडली आहे; आणि त्यांनी लीग तुफान जिंकली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. नवीन सीझनमध्ये आतापर्यंत 10 सामने झाले आहेत पण आयुष बदोनी, तिलक वर्मा (Tilak Varma) आणि ललित शर्मा यासारख्या खेळाडूंनी त्यांच्या संबंधित फ्रँचायझींसाठी त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याची झलक दाखवली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) तिलकच्या 33 चेंडूत 61 धावांच्या धाडसी प्रयत्नाचे शनिवारी चाहत्यांनी आणि तज्ञांनी कौतुक केले. (IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या आता मोठे बदल, सलग दोन पराभवानंतर ‘या’ मात्तब्बर खेळाडूंना दाखवला जाईल रस्ता!)

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 19 वर्षीय फलंदाजाच्या स्वभावाचे कौतुक केले आणि पुढे ते जोडले की वर्माची कामगिरी मुंबई इंडियन्ससाठी एक "शुभ शकुन" आहे. क्रिकबझला दिलेल्या एका मुलाखतीत, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला निवडल्यावर तो, त्याचे प्रशिक्षक आणि त्याच्या कुटुंबाने कशी प्रतिक्रिया दिली याबद्दल तिलकने खुलासा केला. “ज्या दिवशी आयपीएलचा लिलाव सुरू होता, तेव्हा मी माझ्या प्रशिक्षकासोबत व्हिडिओ कॉलवर होतो. जेव्हा बोली वाढत राहिली तेव्हा माझे प्रशिक्षक रडायला लागले. मुंबईने मला खरेदी केल्यानंतर, मी माझ्या पालकांना फोन केला. तेही फोनवर रडू लागले. माझी आई शब्द काढण्यासाठी धडपडत होती,” वर्मा म्हणाला. मुंबईच्या या युवा फलंदाजाने त्याच्या कठोर संगोपनाबद्दल देखील खुलासा केला आणि तो म्हणाले की आयपीएल कराराच्या आधी आपल्या गरजा पूर्ण करणे देखील कठीण होते. “आम्हाला खूप आर्थिक अडचणी आल्या. माझ्या वडिलांना त्यांच्या तुटपुंज्या पगारात माझा क्रिकेटचा खर्च तसेच माझ्या मोठ्या भावाच्या अभ्यासाची काळजी घ्यावी लागली. गेल्या काही वर्षांत काही प्रायोजकत्व आणि मॅच फीसह मी माझ्या क्रिकेटच्या खर्चाची काळजी घेऊ शकलो," वर्मा म्हणाला.

तसेच 19 वर्षीय म्हणतो की त्याला त्याच्या पालकांसाठी घर घ्यायचे आहे. “आमच्याकडे अजून घर नाही. त्यामुळे या आयपीएलमध्ये मी जे काही कमावले आहे, त्यातून माझ्या आई-वडिलांना घर मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे. हा आयपीएल पैसा मला माझ्या उर्वरित कारकिर्दीत मुक्तपणे खेळण्याची लक्झरी देतो.” वर्माने 2020 मधील अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि गेल्या वर्षी देशांतर्गत मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये त्याच्या हैदराबाद राज्य संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आयपीएलच्या लिलावात वर्मासाठी मुंबई इंडियन्ससोबत चेन्नई सुपर किंग्सने बोली लावण्यात रस दाखवला.