IPL 2022, MI vs RR: नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. या दोन्ही संघांनी या वर्षीच्या त्यांच्या मोहिमेची वेगवेगळी सुरुवात केली. एकीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या माजी चॅम्पियन मुंबई इंडियन्सला त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जवळून पराभव पत्करावा लागला आहे. तथापि, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) पुनरागमनामुळे त्यांची फलंदाजी मजबूत होईल, ज्यामुळे दिल्ली फ्रँचायझी विरुद्ध मोठी पोकळी निर्माण झाली होती. दुसरीकडे, संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या राजस्थान रॉयल्सला त्यांना पहिला सामना सहज जिंकला. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांची मजबूत सलामी जोडी राजस्थानसाठी मोठ्या फायद्याची ठरली आहे, पण गोलंदाजांना अधिक सुधार करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएलच्या 9 व्या सामन्याचा निकाल खालील खेळाडूंच्या कामगिरीवर अपेक्षित असेल. (IPL 2022, MI vs RR Likely Playing XI: पराभवानंतर मुंबई करणार पलटवार, तर राजस्थान खेळणार जुना खेळ! असे असतील दोन्ही संघाचे संभाव्य 11 खेळाडू)
1. ईशान किशन
आयपीएल 15 चा सर्वात महागडा खेळाडू ईशान किशन याच्यावर मुंबईने मोठ्या विश्वासाने बोली लावली आहे. पहिल्या सामन्यात 81 धावा करून किशनने आपले कौशल्य दाखवले. ईशानने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने संघाला जोरदार सुरुवात करून दिली, पण मधल्या षटकांत त्याचा धावा करण्याचा वेग मंदावला. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध जेव्हा मुंबई हंगामातील आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात तेव्हा पुन्हा किशनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
2. जोस बटलर
किशनप्रमाणेच राजस्थानसाठी जोस बटलर स्टार सलामी फलंदाज आहे. बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी केलेली सुरूवात अनेकदा निर्णायक ठरली आहे. पहिल्या सामन्यात देखील बटलरने मोलाचे योगदान दिले होते, त्यामुळे मुंबईच्या खतरनाक गोलंदाजांवर सुरुवातीला दबाव आणण्याची जबाबदारी बटलरवर असेल.
3. संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅमसनने हंगामाची जोरदार सुरुवात केली आणि अर्धशतकी पल्ला गाठला. हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात सॅमसनने 55 धावांची महत्वाचा डाव खेळला. सॅमसन अनेकदा आपला सुरुवातीची लय कायम ठेवण्यात अपयशी ठरला आहे, त्यामुळे कर्णधार आणि फलंदाज म्हणून सॅमसनकडून संघाला मोठी अपेक्षा असेल.
4. जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज बुमराह पहिल्या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही याचा परिणाम संघावर झाला. बुमराहवर मुंबईच्या गोलंदाजी क्रमाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे, त्यामुळे त्याच्या कडून सुरुवातीला आणि अंतिम षटकांत संघाला विकेटची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध बुमराहचे लक्ष कमबॅक करून संघाला झोळीत पहिला विजय पाडण्याचा निर्धार असेल.
5. युजवेंद्र चहल
चहल हा सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयातील एक नायक होता. लेगस्पिनरने त्याच्या चार षटकांत 22 धावा देऊन 3 बळी घेतले आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यासाठी धावांसाठी दबाव आणला. किरॉन पोलार्ड सारख्या मोठ्या हिटर विरुद्ध त्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे. अशा परिस्थितीत 31 वर्षीय फिरकीपटूचा आगामी सामन्यात रॉयल्सवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.