IPL 2022, KKR vs DC Match 19: ऋषभ पंतने 6.50 कोटींच्या ‘या’ खेळाडूला एका सामन्यानंतर दाखवला बाहेरचा रस्ता, गेल्या सामन्यात केलेली चूक भोवली
एनरिच नॉर्टजे (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs DC Match 19: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 19 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) आज आमनेसामने आले आहेत. या सामन्यात केकेआरचा (KKR) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अय्यरने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही पण दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल जाहीर केला. त्याने एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) याला बेंचवर बसवले आणि खलील अहमद याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंज देत असलेल्या नॉर्टजेने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मैदानात पुनरागमन केले. मात्र एका सामन्यानंतर पंतने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. (IPL 2022, KKR vs DC Match 19: पृथ्वी शॉ - डेविड वॉर्नर यांचा पॉवरप्ले मध्ये बोलबाला, दिल्लीने चोपल्या बिनबाद 68 धावा)

लखनऊविरुद्ध नॉर्टजे लयीत दिसत नव्हता. त्याचा वेग उत्कृष्ट होता पण त्याला लेंथ आणि लांबीवर लक्ष केंद्रित करता आले नाही. गेल्या सामन्यात त्याने दोन बीमरही फेकले होते, ज्यामुळे त्याला या सामन्यात गोलंदाजी करण्यासही बंदी घालण्यात आली होती. कदाचित याच कारणामुळे पंतने त्याला आज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले असावे. दिल्लीने कायम ठेवलेल्या खेळाडूंपैकी दक्षिण आफ्रिकेचा नॉर्टजे हा एक होता. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल त्याला तब्ब्ल 6.50 कोटी रुपयांत कायम ठेवले होते. अशा स्थितीत एका सामन्यानंतर या खेळाडूला वगळण्याचा निर्णय योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. दिल्ली आणि कोलकाता संघातील सामन्याबद्दल बोलायचे तर दिल्ली आपल्या तिसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरला असेल, तर केकेआरचा संघ पॉईंट टेबलमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता पहिल्या तर दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे.

पहा केकेआरविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा प्लेइंग इलेव्हन: ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद.