पाकिस्तानच्या (Pakistan) आगामी द्विपक्षीय मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मर्यादित षटकांचा पूर्ण ताकदीचा संघ घोषित केला आहे. आरोन फिंच पुन्हा एकदा कांगारू संघाचे नेतृत्व करेल तर मोठ्या खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. डेविड वॉर्नर (David Warner), पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), जोश हेझलवूड या आयपीएल (IPL) स्टार खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध आगामी वनडे व टी-20 मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. पण इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या आगामी आवृत्तीचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकांची टक्कर होत असताना सर्व 10 फ्रँचायझींसाठी विदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ (Australia Cricket Team) 5 एप्रिलपर्यंत त्यांच्या बहु-स्वरूपाच्या दौऱ्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan Tour) असतील. आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका नियामुळे या खेळाडूंना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. (PAK vs AUS 2022: पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वनडे, T20 संघ जाहीर, डेविड वॉर्नर याच्यासह 5 स्टार खेळाडू बाहेर; IPL साठी उपलब्ध असणार स्टार्स?)
तथापि, पहिल्या काही सामन्यांसाठी केवळ संघातील खेळाडूच फ्रँचायझींसाठी अनुपलब्ध नाही असे नाही, जे ऑस्ट्रेलियन खेळाडू व्हाईट बॉल संघात नाहीत, पण क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सोबत करारबद्ध आहेत ते आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. म्हणजेच संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत असताना आयपीएल 2022 मध्ये सहभागी होणार नाहीत. CA बोर्डाच्या धोरणेनुसार, राष्ट्रीय संघ मालिका खेळत असताना करारबद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडू इतर स्पर्धांमध्ये खेळू शकत नाहीत, त्यामुळे डेविड वॉर्नर (दिल्ली), ग्लेन मॅक्सवेल (बेंगलोर), पॅट कमिन्स (कोलकाता) आणि जोश हेझलवूड (बेंगलोर) केवळ 6 एप्रिलपासून निवडीसाठी उपलब्ध होतील. तथापि, ते मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग नसल्यामुळे ते निर्धारित तारखेपर्यंत क्वारंटाइन पूर्ण करू शकतील.
दुसरीकडे, तीन एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्यासाठी पाच आयपीएल बद्ध खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श, सीन अॅबॉट, जेसन बेहरेनडॉर्फ आणि नॅथन एलिस ही मालिका 5 एप्रिल रोजी संपल्यानंतरच भारतासाठी रवाना होतील आणि आवश्यक क्वारंटाईन करणे गरजेचे असल्यामुळे त्यांच्या सहभागास आणखी लांबला जाईल. उल्लेखनीय म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाला सर्वाधिक धक्का बसेल कारण त्यांच्या संघातून 6 एप्रिलपूर्वी वॉर्नर, मार्श, एनरिच नॉर्टजे आणि लुंगी एनगिडी गायब असतील. आयपीएल 2022 चे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही परंतु 15 वी आवृत्ती मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणे अपेक्षित आहे.