डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

PAK vs AUS 2022: तब्ब्ल 24 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour of Pakistan) जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Team) पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिकेनंतर 3 वनडे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) नुकतंच आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर खेळल्या जाणार्‍या मर्यादित षटकांच्या मालिकेत वेगवान त्रिकूट पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्यासह स्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर  (David Warner) आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांना बाहेर केले आहे. या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वरील दिलेले सर्व खेळाडूंना आयपीएल (IPL) 2022 लिलावात फ्रँचायझींनी मोठी बोली लावून खरेदी केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान दौऱ्यावर हे खेळाडू जात नसल्यामुळे आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी सुरुवातीपासून उपलब्ध असतील का असा प्रश्न उपस्थित होत असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. (PAK vs AUS 2022: पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर; जोश हेझलवुड दुखापतीतून परतला तर स्कॉट बोलँड संघात कायम; पहा संपूर्ण टीम)

वॉर्नर, कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांना पाकिस्तान दौऱ्यातून विश्रांती दिली गेली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात सामील होण्यासाठी त्याच्या करारबद्ध स्टार खेळाडूंना सोडणार नाही. कमिन्स, वॉर्नर आणि हेझलवूड हे तिघेही रावळपिंडी येथे येत्या शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. आयपीएलच्या वेळापत्रकाची पुष्टी झालेली नाही परंतु लाहोरमधील तिसऱ्या पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटीनंतर 26-27 मार्च पासून सुरू होणार असल्याचे मोठ्या प्रमाणावर सांगण्यात येत आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्यांची मालिका मार्च-एप्रिल महिन्यात खेळवली जाईल. मालिकेची सुरुवात वनडे सामन्याने 29 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान होईल. त्यानंतर एकमेव टी-20 सामना खेळवला जाईल, जो 5 एप्रिल रोजी होईल. दोन्ही देशांमधील व्हाईट बॉल मालिका रावळपिंडी या एकाच शहरात आयोजित केली जाईल. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि टी-20 संघ खालीलप्रमाणे आहे.

आरोन फिंच (क), शॉन एबॉट, अ‍ॅश्टन आगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, बेन मॅकडरमॉट, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅडम झाम्पा.