IPL 2022, CSK vs PBKS Match 11: पंजाब किंग्सने (Punjab Kings) टॉस गमावून पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत 8 बाद 180 धावा केल्या आणि चेन्नई सुपर किंग्सपुढे (Chennai Super Kings) विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने सर्वाधिक 60 धावा केल्या. तर शिखर धवनने 33 आणि जितेश शर्माने 26 धावांचे योगदान दिले. एकावेळी पंजाब दोनशे धावांवर पल्ला गाठेल असे दिसत होते, पण सीएसके गोलंदाजांनी त्यांच्या धावगतीला लगाम लावला. चेन्नईकडून क्रिस जॉर्डन (Chris Jordan) आणि ड्वेन प्रिटोरियस (Dwaine Pritorious) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ब्रावोच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर त्याने शेवटच्या षटकात केवळ चार धावा खर्च करत पंजाबला 180 धावांत रोखले.
Innings Break!@PunjabKingsIPL post 1⃣8⃣0⃣/8⃣ on the board on the back of @liaml4893's cracking 6⃣0⃣. 👍 👍@CJordan & Dwaine Pretorius picked 2⃣ wickets each for @ChennaiIPL. 👌 👌
The #CSK chase to begin shortly. #TATAIPL | #CSKvPBKS
Scorecard ▶️ https://t.co/ZgMGLamhfU pic.twitter.com/7EgimNQIlL
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)