IPL 2021 SRH vs DC Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये आज काट्याची टक्कर, Star Sports Network वर असे पाहा लाईव्ह प्रक्षेपण
डेविड वॉर्नर आणि शिखर धवन(Photo Credit: PTI)

IPL 2021 SRH vs DC Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात बुधवार, 22 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्ली आणि हैदराबादचे संघ आमनेसामने भिडतील. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) करत आहे तर SRH चे नेतृत्व केन विल्यमसन (Kane Williamson) करत आहे. दोन्ही संघ चालू हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. सामन्याच्या पहिल्या लेगमध्ये दिल्लीने हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL 2021 चा 33 वा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे स्ट्रीमिंग भारतात Disney+ हॉटस्टार आणि Jio TV वर उपलब्ध असेल. तसेच तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्लिश आणि हिंदी भाषेत सामना लाईव्ह पाहायला मिळेल. (IPL 2021 SRH vs DC Match 33: टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह, जवळच्या संपर्कात आल्यामुळे विजय शंकरही आयसोलेट)

दरम्यान, युवा कर्णधार पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद जवळपास प्रत्येक सामन्यात संघर्ष करताना दिसला. दिल्लीने पहिल्या टप्प्यात 8 पैकी 6 सामने जिंकले. सध्या डीसी 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच हैदराबादने पहिल्या लेगमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती आणि ते पिछाडीवर होते. SRH ने सात पैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि दोन गुणांसह ते सध्या पॉईंट टेबलच्या तळाशी बसलेले आहेत. सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर त्याच्या जवळच्या संपर्कात आलेला विजय शंकर सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, आज संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सामन्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

दिल्ली कॅपिटल्स: रिषभ पंत (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉम हेटमायर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, एनरिच नॉर्टजे, अवेश खान, बेन द्वारशुईस, इशांत शर्मा, कगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया , लुकमन मेरीवाला, प्रवीण दुबे, टॉम कुरन, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्स आणि विष्णू विनोद.

सनरायझर्स हैदराबाद: केन विल्यमसन (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रदरफोर्ड, रिद्धीमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, राशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, बेसिल थंपी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जगदीशा सुचित, जेसन होल्डर, विराट सिंह, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, जेसन रॉय.