T Natarajan Test COVID-19 Positive: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील चौथा सामना आज दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनची (T Natarajan) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्याने स्वतःला उर्वरित संघापासून वेगळे केले आहेत. आयपीएलने (IPL) हे स्पष्ट केले आहे की इतर सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि अशा परिस्थितीत आज होणारा सामना रद्द केला जाणार नाही. नटराजनसह त्याच्या जवळच्या संपर्कात आलेला विजय शंकर आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळू शकणार नाहीत.
दरम्यान, नटराजनमध्ये आतापर्यंत कोणतीही लक्षणे दिसली नाही आहेत. वैद्यकीय संघाच्या सल्ल्यानुसार, नटराजनच्या जवळच्या संपर्कात आलेले सहा खेळाडू आणि कर्मचारी सदस्यांनीही स्वतःला वेगळे केले आहे. विजय शंकर, टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉ अंजना वनान, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पेरियासामी गणेशन हे सर्व नटराजनच्या जवळच्या संपर्कात आले आहेत. “सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी नटराजन यांची अनुसूचित RT-PCR चाचणीमध्ये COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खेळाडूने उर्वरित संघापासून स्वतःला वेगळे केले आहे. तो सध्या लक्षणविरहित आहे. जवळच्या संपर्कांसह उर्वरित तुकडीची RT-PCR टेस्ट केली असून आज सकाळी 5 वाजता स्थानिक चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परिणामी, आज रात्री सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई येथे होईल,”निवेदनात म्हटले आहे.
T Natarajan has tested positive for COVID-19, and is presently in isolation.
We wish you a swift and full recovery, Nattu. 🙏 https://t.co/vZDP6gvLLT pic.twitter.com/6x7OSunc7m
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 22, 2021
लक्षात घ्यायचे की आयपीएल बायो-बबलमधील अनेक खेळाडू कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल 2021 चा पूर्वार्ध स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर भारतातील कोविड-19 परिस्थिती लक्षात घेऊन ही स्पर्धा नंतर यूएईमध्ये हलवण्यात आली. विशेष म्हणजे गुडघ्याच्या दुखापतीनंतर नटराजन पुनरागमन करत होता, ज्यासाठी त्याच्या शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.