IPL 2021, RR vs RCB Live Streaming Online: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. सातव्या स्थानाच्या राजस्थानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात त्यांच्यासाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती असेल. आरसीबी (RCB) दहा सामन्यांत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल्सचा पराभव करून त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. दुसरीकडे, रॉयल्सचे दहा सामन्यांतून आठ गुण आहेत आणि प्लेऑफसाठी आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. राजस्थान आणि बेंगलोरचा 43 वा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर राजस्थान विरुद्ध बेंगलोर सामना पाहू शकतात. तसेच डिस्नी + हॉटस्टारवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल. (IPL 2021 Points Table Updated: आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल; KKR चौथ्या क्रमांकावर दाखल, तर MI ची पाचव्या स्थानी झेप)
आयपीएलच्या युएई आवृत्तीत आरसीबीची चांगली सुरुवात झाली नाही आणि दोन सामन्यांमध्ये सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. दुसरीकडे, राजस्थानने पहिला सामना दोन धावांनी जिंकल्यानंतर मागील दोन्ही सामने गमावले आहेत. कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल वगळता सर्व फलंदाज खराब फॉर्मशी झगडत आहेत. गोलंदाजांमध्ये कार्तिक त्यागी, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहमान यांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, आरसीबीसाठी गोलंदाजीमध्ये हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध शेवटच्या सामन्यात हॅटट्रिकसह तीन सामन्यांत सहा विकेट घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलनेही पाच विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनला दोन सामन्यांमध्ये एकही विकेट मिळाली नाही.
पाहा राजस्थान आणि बेंगलोर संघ
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), लियाम लिविंगस्टोन, एविन लुईस, डेविड मिलर, क्रिस मॉरिस, ओशाने थॉमस, मुस्तफिजूर रहमान, तबरेज शम्सी, ग्लेन फिलिप्स, चेतन सकारिया, रियान पराग, राहुल तेवाटिया, आकाश सिंह, अनुज रावत, के. करिअप्पा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, महिपाल लोमर.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन, रजत पाटीदार, दुशमंथ चमिरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वनिंदू हसरंगा, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमीसन, सुयश प्रभुदेसाई, के. एस भरत, टिम डेविड, आकाश दीप, एबी डिव्हिलियर्स.