आयपीएल 2021 (IPL 2021) चा हंगाम आजपासून सुरु होणार असून त्याचे प्रक्षेपण स्टार (Star) आणि डिज्नी इंडियाकडे (Disney India) देण्यात आले आहे. या 14 व्या सीजनची कॉमेंट्री करण्यासाठी विविध भाषामधील 100 कॉमेंटेटर्सची यादी स्टार आणि डिज्नीने जारी केली आहे. यंदा तब्बल 8 भारतीय भाषांमध्ये आयपील सामन्यांची कॉमेंट्री होणार असून यात मराठी भाषेचाही समावेश आहे. त्यामुळे आता तुम्ही मराठी (Marathi) भाषेतही आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकाल.
आयपीएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नडा, मल्याळम, बंगाली आणि मराठी भाषेतून डिज्नी+हॉटस्टारवर दिसेल. यासोबत अॅनालिटीकल कॉमेंट्रीसाठी डगआऊटमध्ये ब्रायन लारा, ब्रेट ली, ग्रँम्स स्वॉन, डामनिक कॉर्क आणि स्कॉट स्टायरस सारखे दिग्गज उपस्थित असतील. यासोबतच शेन वॉटसन, डेलस्टेन, रॉस स्टेरर, केव्हिन पीटरसन हे देखील उपस्थित असतील. विशेष म्हणजे मराठी कॉमेंट्रीसाठी विनोद कांबळी, संदीप पाटील, अमोल मुजूमदार, स्नेहल प्रधान, कुणाल दाते, प्रसन्ना संत आणि चैतन्य संत उपलब्ध असतील. (IPL 2021: Michael Vaughan यांची भविष्यवाणी, मुंबई इंडियन्स किंवा हा संघ बनेल आयपीएल चॅम्पियन; Netizens ने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया)
8 वेगवेगळ्या भाषांमधील कॉमेंटेटर खालील प्रमाणे असतील:
हिंदी: आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, गौतम गंभीर, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आर.पी. सिंग, सुनील गावसकर.
तामिळ: अभिनव मुकुंद, एस.बद्रीनाथ, हेमांग बदानी, यो महेश, सदागोपन रमेश, आर.श्रीनिवासन,
मुथुरामन आर, के व्ही सत्यनारायणन, आर जे बालाजी, कृष्णमचारी श्रीकांत, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि रसेल अर्नोल्ड.
कन्नडः व्यंकटेश प्रसाद, जी.के. अनिल कुमार, अखिल बालाचंद्र, श्रीनिवास मूर्ती, भारत चिपली, विजय भारद्वाज, विनय कुमार.
तेलुगु: वेणुगोपाल राव, आशिष रेड्डी, एमएसके प्रसाद, कौशिक एनसी, कल्याण कृष्णा आणि शशिकांत अवुलापल्ली.
बंगाली: रणदेव बोस, जयदीप मुखर्जी, बोरिया मजूमदार, संजीब मुखर्जी, सरदिंदू मुखर्जी, लक्ष्मी रतन शुक्ला, गौतम भट्टाचार्य आणि देबाशिष दत्ता.
मल्याळम: शियास मोहम्मद, विष्णू हरिहरन, सीएम दीपक, सोनी चेरुवाथुर, टीनू योहानान आणि रेफी गोमेझ.
आयपीएलचा 14 वा हंगाम आज सुरु होणार असून पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचे प्रक्षेपण 7.30 वाजता सुरु होईल.