IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14 वा हंगाम सुरु होण्यास आणखी दोन दिवस शिल्लक असताना माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी स्पर्धेबाबत आपला लवकर अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलचा (IPL) आगामी हंगाम जिंकून विजेतेपदाची हॅटट्रिक करेल असा अंदाज वर्तवला आहे. वॉनने असेही म्हटले की योगायोगाने जर मुंबई इंडियन्सला ‘फॉर्मबाबतीत काही नुकसान’ झालं तर डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) हे विजेतेपद जिंकेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “लवकर आयपीएल 2021 पूर्वानुमान... @mipaltan ते जिंकेल... जर काही विचित्र फॉर्ममुळे तो गमावला तर सनरायझर्स ते जिंकतील... #OnOn #India,” वॉन यांनी बुधवारी ट्विट केले. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल. (IPL 2021: पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सला यंदा आयपीएल जेतेपदासाठी कोणता संघ देऊ शकतो टक्कर, Aakash Chopra यांनी या टीमवर लावला दाव)
दरम्यान वॉन यांच्या ट्विटर पोस्टवर यूजर्सने देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्याचे पाहायाला मिळत आहे. एकाने म्हटले की त्यांची भविष्यवाणी विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासारखी आहे तर काहींनी त्यांना पनोती लावत असल्याचंही म्हटलं.
Early #IPL2021 prediction ... @mipaltan will win it ... if by some bizarre loss of form then @SunRisers will win it ... #OnOn #India
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 7, 2021
कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासारखी भविष्यवाणी!
Your prediction is just like Virat Kohli Winning the IPL Trophy.
— Deep Point (@ComeonPant) April 7, 2021
समान बांधा!
Khatam tata bye bye packup 😭😭😭
— R A T N I S H (@LoyalSachinFan) April 7, 2021
सगळी मजा घालवली!
MI and SRH fans Right Now pic.twitter.com/TyicVq1aIS
— Dr Khushboo 🙊 (@khushbookadri) April 7, 2021
मुंबई तुम्हाला योग्य ठरवेल!
This jinxing doesn't work with MI 💙
They'll prove u right pic.twitter.com/jAJNBzXyrS
— GAURAV #MI💙 (@ThisIsGaurav_) April 7, 2021
मुंबई आणि हैदराबाद फॅन्स
MI & SRH fans (including me) after watching this tweet & looking at playoffs chances : pic.twitter.com/ewfBQVPKMR
— | A J A Y | (@Bruhmit69) April 7, 2021
पानोती आहे रे भावांनो!
हा लई मोठा पानोती आहे रे भावांनो, आता काही खरं नाही @mipaltan च, नीता ताई दोन चार नारळ जास्त चढवा आपल्या सिद्धिविनायकला तेव्हा कुठे हा अपशकुन कमी होईल.☺️☺️☺️
— Dr. Nilesh J. Patil (@nileshalways4u) April 7, 2021
गेल्या वर्षी आयपीएल 2020 फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर वर्चस्व गाजवत मुंबई इंडियन्सने सलग दुसरे आणि पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले. अशास्थितीत जे त्यांना आपले विजेतेपद कायम ठेवण्यात सक्षम राहिले मुंबई विजेतेपदाची हॅटट्रिक करणारा पहिला संघ ठरू शकतो. 2010 आणि 2011 मध्ये मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन विजेतेपद जिंकले आहेत.