KXIP To Change Name ahead of IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या सत्रासाठी लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, लिलावापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदा पंजाबने आपल्या वरच्या नेतृत्वात कोणताही बदल केलेला नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबचे नवे नाव Punjab Kings झाले असून आता टीम या नावाने ओळखली जाईल. किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएलच्या (IPL) अशा काही संघांपैकी एक आहे ज्यांना आतापर्यंत एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही, परंतु 14व्या सत्रापूर्वी संघाने मोठा बदल केला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने सांगितले की, “संघ बर्याच काळापासून नाव बदलण्याचा विचार करीत होता आणि असे वाटते की या आयपीएलपूर्वी हे करणे योग्य होईल. हा अचानक घेतलेला निर्णय नाही." मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांचा संघ एका हंगामात उपविजेता राहिला होता तर एकदा गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळविला. (IPL Auction 2021: ‘हा’ भारतीय आहे आयपीएल लिलाव राजा, नाही मोडू शकला सर्वात महागड्या खेळाडूचा रेकॉर्ड; ‘हा’ ऑस्ट्रेलियन सर्वात महाग Costliest विदेशी क्रिकेटर)
दरम्यान, यंदाच्या आयपीएलची सुरुवात एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यात होणार असून, लिलाव गुरुवार, 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आयपीएल 2021 लिलावापूर्वी, पंजाब किंग्जने त्यांचे बरेच खेळाडू रिलीज केले होते, त्यामुळे या वेळी लिलात जाण्यापूर्वी संघाकडे आता सर्वाधिक 53.20 कोटी रुपये शिल्लक आहे. यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक रक्कम असून पंजाबचे शेर आपल्या आवडीच्या खेळाडूंना खरेदी करुन आयपीएलच्या मैदानात उतरू इच्छित आहे जेणेकरून संघाने उत्कृष्ट कामगिरी करेल. मागील वर्षी या संघाने केएल राहुलला आपला नवीन कर्णधार बनवले तसेच अनिल कुंबळे यांचा प्रशिक्षक म्हणून समावेश केला होता. विशेष म्हणजे, कुंबळे एकमेव भारतीय आहे जे कोणत्याही आयपीएल संघाचे प्रशिक्षक आहेत, इतर सर्व संघांचे प्रशिक्षक विदेशी आहेत. 2021 हंगाम सुरू होण्यापूर्वी पंजाबने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसह नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला होता. संघाने मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपयांत विकत घेतले होते, परंतु त्याला संघासाठी काही खास कामगिरी करता आली नाही आणि 13 सामन्यांत तो फक्त 108 धावा करू शकला.
दुसरीकडे, मॅक्सवेल व्यतिरिक्त फ्रँचायझीने वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल, न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशम, भारताचा फलंदाज करुण नायर आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान यांनाही रिलीज केले आहे.