IPL 2021 Qualifier-2 सामन्यात दिनेश कार्तिकने केले हे कृत्य, BCCI ने फटकारले; जाणून घ्या असे काय घडले
दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन (Photo Credit: Instagram)

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला  (Dinesh Karthik) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) शारजाह येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध त्याच्या संघाच्या क्वालिफायर-2 सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बुधवारी दंड ठोठावण्यात आला. “कार्तिकने आयपीएलच्या आचारसंहितेच्या 2.2 लेव्हल 1 च्या गुन्ह्याची कबुली दिली आणि मंजुरी स्वीकारली. आचारसंहितेच्या लेव्हल 1 च्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.” सध्या, दिनेश कार्तिकला फक्त बीसीसीआयने (BCCI) फटकारले आहे, परंतु भविष्यात त्याच्या या चुका त्याला खूप महागात पडू शकतात. त्याच्यावर एक सामन्याची बंदी सुद्धा लागू शकते, पण कार्तिकची चूक काय होती हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. आयपीएलच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. शारजाच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर त्यांच्या सलामीवीरांच्या भक्कम सुरुवातीनंतर कोलकाताने 19.5 षटकात 136 धावांचे लक्ष्य साध्य करून फायनल सामन्यात प्रवेश केला.

दिनेश कार्तिकने आयपीएलच्या आचारसंहितेच्या उल्लंघनाचे नेमके स्वरूप आयपीएलने स्पष्ट केलेले नाही, परंतु बुधवारी एका हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान कार्तिक बाद झाल्यावर स्टंप उखडवताना दिसला. कदाचित हेच कारण आहे ज्यामुळे कार्तिकला बीसीसीआयने फटकारले आहे. दरम्यान बुधवारी केकेआरने दिल्लीविरुद्ध तीन गडी राखून विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. राहुल त्रिपाठीने 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. तसेच सुरुवातीला सलामीवीर व्यंकटेश अय्यरने शानदार अर्धशतक झळकावले होते, ज्यामुळे त्याला सामनावीराचा किताब मिळाला.

दिल्लीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने 12.1 षटकांत 96/0 धावा केल्या, परंतु त्यानंतर, इयन मॉर्गनच्या संघाने केवळ सात धावांवर सहा गडी गमावले. राहुल त्रिपाठीने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनच्या गोलंदाजीवर षटकारासह संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. केकेआर 15.5 षटकांत 1 बाद 123 धावांवर मजल मारली होती, पण तिथून त्यांना फलंदाजीक्रम कोसळला. केकेआरला शेवटच्या षटकातून सात धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे शाकिब अल हसन (0) आणि सुनील नरेन (0) यांना काढून अश्विनने संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या पण त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून केकेआरला शेवटी एक आश्चर्यकारक विजय मिळवून दिला.