IPL 2021, CSK vs KKR: आपल्या चुकीने Shubman Gill धावचित, युवा फलंदाज व्यंकटेश अय्यरवर असा काढला राग (Watch Video)
शुभमन गिल रन आऊट (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 38 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) सुरु आहे. केकेआरचा (KKR) कर्णधार इयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल (Shubman Gill) लवकर बाद झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी जोमाने फलंदाजी करत संघाला 5 षटकांत 50 धावा धावांपर्यंत मजल मारू दिली. गिल बॅटिंगने काही खास करू शकला नाही आणि धावा चोरण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. गिल स्वतःच्या चुकीमुळे बाद झाला पण तो व्यंकटेश अय्यरवर (Venkatesh Iyer) आपला राग दाखवताना दिसला. कोलकाताच्या संघाने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला आहे, तर सीएसकेने ड्वेन ब्रावोच्या जागी सॅम कुरनचा समावेश केला आहे. शुभमन गिल डावातील पहिल्याच ओव्हर माघारी परतला. (IPL 2021, CSK vs KKR: दिनेश कार्तिक-नितीश राणाची शानदार फलंदाजी, कोलकाताची 171 धावांपर्यंत मजल)

डावाच्या पहिल्याच षटकात शुभमन गिलने दीपक चहरच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकारांसह सुरुवात केली, पण त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, त्याला धावा चोरण्याची घाई झाली आणि अंबाती रायुडूने सरळ थ्रो करत त्याला धावचीत केले. दुर्दैवाने आपली विकेट गमवणार गिल युवा सलामी साथीदार व्यंकटेश अय्यरवर नाराजी व्यक्त करताना दिसला. मात्र युवा फलंदाजाने धावा घेण्यासही नकार दिला होता. शुभमन गिल 5 चेंडूत 9 धावा केल्यावर बाद झाला. मुंबईविरुद्ध या केकेआर सलामीवीराने चांगली सुरुवात केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आपली विकेट भेट दिली. विशेष म्हणजे दीपक चाहरने सीएसकेसाठी पहिली ओव्हर टाकली. या दरम्यान ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शुभमनला जीवदान मिळाले होते. मात्र याचा तो अधिक फायदा करू शकला नाही आणि पुढील चेंडूवर माघारी परतला.

केकेआरने यूएई लेगची चांगली सुरुवात केली आहे आणि संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनच्या नेतृत्वातील संघाने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. कोलकाताचा संघ या सामन्यापूर्वी गुणतालिकेत 9 सामन्यात 4 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तथापि, प्लेऑफ शर्यत मनोरंजक बनली असल्याने प्रत्येक सामना संघासाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे.