IPL 2020 Qualifier-2: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर (IPL Qualifier 2) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) 'गब्बर' स्टाईल फलंदाजी केली आणि संघाच्या महत्वाची भूमिका बजावली, पण तरीही युवराज सिंहने (Yuvraj Singh) त्याला DRS न घेतल्याबद्दल ट्रोल केलं. धवनने आपल्या अपयशाची मालिका मागे टाकत महत्वाच्या सामन्यात 50 चेंडूत 78 धावांचा दमदार डाव खेळला. त्याने आयपीएलमधील (IPL) 41वे अर्धशतक ठोकले, पण त्याच्या विकेटने युवराजचे लक्ष वेधले. रिव्हर्स रॅम्प शॉट खेळण्याच्या प्रयत्नात असताना धवनची दिल्लीच्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये संदीप शर्माच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होऊन माघारी परतला. हैदराबादने अपील केले आणि पंचांनी बोट उचलत निर्णय त्यांच्या बाजूने दिला. आपण प्लंब आऊट आहोत असे वाटल्याने अंपायरने आऊट देण्यापूर्वीच धवन मैदानाबाहेर दिशेने चालू लागला. पण तो परत जात असताना, मोठ्या स्क्रीनवर पुन्हा रिप्लेमधून दिसले की चेंडू त्याला ऑफ-स्टंपच्या रेषे बाहेर पडला आहे. (IPL 2020 Final: केएल राहुलच्या 'ऑरेंज कॅप'ला शिखर धवन याच्याकडून धोका, अव्वल स्थानासाठी DC च्या 'गब्बर'ला इतक्या धावांची गरज)
यानंतर युवराजने ट्विटरवर पहिला डाव संपल्यावर ट्विट केलं. त्याने संदीप शर्मा आणि टी नटराजन यांचं कौतुक केलं, तसेच धवनच्या धडाकेबाज खेळीचीही स्तुती केली पण सोबतच त्याने DRS घ्यायला विसरलास का? असाही मजेत सवाल धवनला केला. "फॉर्मात शिखर धवन पण नाम तर जट्टजी आहे... DRS बद्दल काय? नेहमीप्रमाणे विसरलास असाल," युवराजने ट्विट केले आहे. धवनने युवीच्या ट्विटची दखल घेतली आणि मजेशीर रिप्लाय दिला. धवनने लिहिलं की "पाजी, मला वाटलं की मी प्लंब आऊट आहे म्हणून मी सरळ तंबूच्या दिशेने चालत गेलो. सीमारेषेपर्यंत पोहोचल्यावर समजलं की मी नाबाद होतो." त्यावेळी धवनचा फलंदाजीचा साथीदार शिमरॉन हेटमायरलाही बाद केल्याबद्दल विचारले होते, पण त्याने भारतीय स्टारला निर्णयाचा DRS घेण्यास उद्युक्त केले नाही.
Hahahah pajhi mainu lag gya plumb hai tah muuh chuk chal paya jadh boundary tey pahuncha tadh pata lag gya 🤣🤣🤣🤣🤣
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 9, 2020
हैदराबादविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात धवनसोबत मार्कस स्टोइनिस सलामीला आला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. धवनने नंतर आऊट होण्यापूर्वी हेटमायरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. हेटमायर 22 चेंडूत 42 धावांवर नाबाद राहिला तर स्टोइनिसने 27 चेंडूत 38 धावा फटकावल्या. आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्लीचा सामना आता मुंबई इंडियन्सशी होणार आहे.