रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचा सहकारी एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्यामध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर चांगले संबंध आहेत. मैदानाबाहेरील त्यांची मैत्री मैदानावर त्यांच्या खेळात दिसुन येते. कोहली आणि डिव्हिलियर्स हे वर्षानुवर्षे आरसीबी (RCB) संघाचे मजबूत आधारस्तंभ राहिले आहेत आणि दोघे संघासाठी मॅच-विनिंग कामगिरीचे प्रदर्शन करत आहेत. कोहली आणि डिव्हिलियर्स यांच्यात मैत्री गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे आणि दोघे एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. कोहली आणि डिव्हिलियर्स दोघांमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) अनेक संस्मरणीय भागीदारीत पाहायला मिळाली आहे. गुरुवारी, कोहलीने इंस्टाग्रामवर मुंबई इंडियन्सविरुध्द त्यांच्या सुपर ओव्हर दरम्यान डिव्हिलियर्स सोबतचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आणि खेळातील मैत्रीचे महत्त्व स्पष्ट केले. (Virat Kohli React On Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली 'अशी' प्रतिक्रिया)
कोहली म्हणाला की, सहकार्यांबरोबर परस्पर आदर आणि मैत्री ही खेळाविषयी सर्वात खास गोष्ट आहे. “खेळाबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रवासा दरम्यान आपण आपली आपल्या सहकाऱ्यांशी असलेली मैत्री आणि परस्पर आदर. खेळ सुंदर आहे," आरसीबी कर्णधाराने डिव्हिलियर्ससोबतचा फोटो शेअर करून कॅप्शन लिहिले. डिव्हिलियर्ससह कोहली देखील चॅलेंजर्सचा अविभाज्य भाग आहेत. 2008 सालापासून कोहली आरसीबीकडून खेळत असताना एबीडी 2011मध्ये फ्रँचायझीत सामील झाला. त्यापूर्वी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स)कडून तीन वर्ष खेळला. पाहा कोहलीची भावुक पोस्ट:
कोहली आणि डिव्हिलियर्स पुन्हा एकदा आयपीएलच्या चालू हंगामात आरसीबीसाठी धावा करण्याची जबाबदारी सांभाळतील. डिव्हिलियर्सना आजवर यंदाच्या आयपीएल हंगामात दोन अर्धशतक ठोकले आहे, दुसरीकडे, कोहलीला अद्याप सूर गवसलेला नाही. कोहलीने यंदा आयपीएलच्या 3 सामन्यात फक्त 18 धावा केल्या आहेत, पण आगामी सामन्यात विराट मोठा डाव खेळू पाहत असेल. आरसीबीचा पुढील सामना शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल. कोलकाता नाईट रायडर्सने दुबईमध्ये बाजी मारल्यानंतर रॉयल्सचा बुधवारी आयपीएल 2020 मध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.