IPL 2020 Update: इंडियन प्रीमियर लीग 13 चे सप्टेंबर महिन्यात आयोजन करण्यासाठी UAE सज्ज, फ्रेंचायझींनी दिला ग्रीन सिग्नल
रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 13 व्या आवृत्तीबाबत च्या भविष्याबाबत संभ्रम कायम आहे. आयपीएल (IPL) 2020चे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवरील अंतिम निर्णयावर अवलंबून आहे. आयसीसीची स्पर्धा रद्द होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे अशा स्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आयपीएलचे आयोजन करण्यासाठी एक विंडो उपलब्ध होईल. Outlookच्या अहवालानुसार आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 रद्द करणे ही केवळ “काळाची बाब” आहे आणि बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो दरम्यान आयपीएल 2020 संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) मध्ये आयोजित करणार आहे.  शिवाय, या आठवड्याच्या सुरुवातीला आयपीएल फ्रँचायझी (IPL Franchise) मालकांची भेट झाली आणि यावर्षी परदेशात आयपीएल खेळवण्यासाठी ग्रीन सिग्नल दर्शवला. (IPL 2020 आधी दुबईमध्ये टीम इंडियासाठी BCCI आयोजित करणार सराव शिबीर, UAE मध्ये आयपीएल होऊ शकते स्पर्धा)

29 मार्च ते 17 मे दरम्यान आयपीएल 2020 होणार होते, पण बीसीसीआयला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. कोरोना व्हायरस प्रोटोकॉल दरम्यान युएई (UAE) मधील सामने रिकाम्या स्टेडियमसमोर आयोजित केले जाईल. “ती काही अडचण नाही. टीव्हीसाठी आयपीएल अधिक तयार केले जाते आणि गर्दी जरी आली तरी गेटच्या पावत्या जास्त मिळणार नाहीत,” एका टीम मालकाने अहवालात म्हटलं. मध्य पूर्व देश बीसीसीआयला जागेसाठी अनुकूल केले. दुबई, शारजाह आणि अबू धाबीमधील स्टेडियम एकमेकांपासून फारसे दूर नाहीत आणि खेळाडू, अधिकारी व प्रसारण अधिकारी यांना सामावून घेण्यासाठी पुरेशी पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहे. दरम्यान, स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी आयपीएलचे संघ युएईमध्ये दाखल होतील. “आम्हाला तयारीसाठी एक महिना हवा आहे परंतु आमचे परदेशी खेळाडू खेळायला सज्ज होतील,” संघ मालकाने म्हटले.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएलचे भारतात आयोजन करताना प्राधान्य असून परिस्थिती सुधारली नाही तर बोर्ड देशाबाहेर जाण्यास मागेपुढे पाहणार नाही असेपूर्वी म्हटले होते. युएईमध्ये आयपीएल आयोजित करणे बीसीसीआयसाठी काही नवीन नाही. 2014 मध्ये, निवडणुकांमुळे स्पर्धेचा एक भाग युएईमध्ये घेण्यात आला होता, तर 2009 निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेत संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.