IPL 2020 Update: UAE येथे आयपीएलसाठी BCCI ला क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल, 2 ऑगस्टला गव्हर्निंग कौन्सिल बैठकीची शक्यता, जाणून घ्या पूर्ण Details
मुंबई इंडियन्स आयपीएल (Photo Credit: Getty)

संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे यंदा इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) आयोजन करण्यासाठी भारतीय क्रीडा मंत्रालयाने (Sports Ministry) बीसीसीआयला (BCCI) ग्रीन सिग्नल दिला आहे. भारतात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे या वर्षी 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर युएईमध्ये आयपीएल (IPL in UAE) आयोजित करण्याचा दरम्यान प्रस्तावित देण्यात आला होता. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मंत्रालयाकडून सोमवारी बीसीसीआयला अनिवार्य मंजुरी पाठविली गेली. यामुळे आता, परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय (MHA) यांच्या मंजुरीची आता प्रतीक्षा असेल ज्याच्यानंतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशात आयपीएल करण्याचे मार्ग मोकळे होती. वृत्तात पुढे म्हण्टल्यानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या विकासाची पुष्टी केली आणि म्हटले की एकदा सर्व मंजुरी मिळाल्यानंतर बोर्ड त्यानंतर आपली मानक कार्यवाही प्रक्रिया (SOP) क्रीडा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवेल. (IPL 2020 Update: UAE मध्ये आयपीएल खेळवण्यावर BCCI समोर नवीन आव्हाने; WAGS, स्थानिक ड्रायव्हर्स, सुरक्षितता असे बरेच प्रश्न अद्याप निरुत्तर)

एकदा एसओपी मंजूर झाल्यावर ते फ्रँचायझींच्या ताब्यात देण्यात येईल आणि हे चरण पूर्ण झाल्यानंतरच व्हिसा प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, बीसीसीआयकडून देशात आयपीएल आयोजित करण्यासाठी औपचारिक पत्र प्राप्त झाल्याची एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) सोमवारी पुष्टी केली. दुसरीकडे, इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलची बैठक रविवार 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती IANSला आधीच दिली होती आणि आता कौन्सिल सदस्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

IANSशी बोलताना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या अधिकाऱ्याने याची पुष्टी केली की ही बैठक 2 ऑगस्टला होणार आहे. "आम्हाला कळविण्यात आले आहे की आयपीएल जीसी रविवारी होईल आणि आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीच्या संघटनेशी संबंधित सर्व बाबींवर बैठकीत चर्चा होईल," अधिकाऱ्याने म्हटले. यापूर्वी पटेल यांनी लीगसाठी 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर विंडो ब्लॉक केली गेल्याची पुष्टी केली होती.