कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाचा क्रिकेट जगतावरही मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल (India Premier League 2020) स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यामुळे यावर्षी आयपीएल होणार की नाही? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला 4 हजार कोटीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने या हंगामाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. श्रीलंका (Sri Lanka) आणि युएईनंतर (UAE) आता न्यूझीलंडनेही (New Zealand) आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली आहे. यामुळे इंडियन प्रीमियर लीग 13 स्पर्धेचे आयोजन न्यूझिलंडमध्ये होणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी यंदाची स्पर्धा देशाबाहेर जाणार असल्याचे सांगितले होते. याआधीही 2009 साली आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत तर, 2014 साली युएईमध्ये करण्यात आले होते. दरम्यान, श्रीलंका आणि युएईनंतर न्यूझीलंडनेही आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, याबाबत बीसीसीआय नेमका काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे देखील वाचा- IPL 2020 Update: टी-20 वर्ल्ड कप निर्णयाबाबत सतत उशीर झाल्याने BCCI चा ICC ला इशारा, आयपीएलच्या नियोजनाच्या तयारीला करणार सुरुवात
भारतात स्पर्धेचे आयोजन करणे हे बीसीसीाय समोरचे पहिले प्राधान्य आहे. मात्र, देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर यंदाची स्पर्धा देशाबाहेर आयोजित करण्याबद्दलही विचार सुरुच आहे. श्रीलंका आणि युएईनंतर न्यूझीलंडनेही आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. स्पर्धेशी संबंधित सर्व व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर याबद्दल निर्णय घेतला जाईल. आयोजन कुठेही करण्यात आले तरीही खेळाडूंची सुरक्षा हा पहिला महत्वाचा मुद्दा असणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.