IPL 2020: मुंबई इंडियन्स संघात शामिल झाला ट्रेंट बोल्ट, राजस्थान रॉयल्सने अंकित राजपूतला पंजाबसह केले ट्रेड
ट्रेंट बोल्ट (Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीने बुधवारी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याला आगामी मोसमात संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली. मागील र्षी बोल्ट दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळला होता. दिल्लीने बोल्टला मुंबई इंडियन्ससह ट्रेड केले. 2014 मध्ये बोल्टने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर 33 आयपीएल सामन्यात 38 विकेट घेतले आहे. 2018 च्या आयपीएलपूर्वीच्या लिलावात त्याला दिल्ली कॅपिटलने जवळपास 2.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. दिल्लीकडून दोन हंगामात खेळल्यानंतर बोल्ट आता आयपीएलच्या नवीन सत्रात मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. चार वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने यापूर्वी वेस्ट इंडिजच्या शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford) याला संघात समाविष्ट केले होते. बोल्टने 2018 मध्ये दिल्लीसाठी 18 विकेट्स घेऊन 18 सामने खेळले होते. यानंतर, 2019 च्या आयपीएलमध्ये त्याला खास कामगिरी करता आली नाही आणि पाच सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. (IPL 2020: आयपीलच्या नव्या हंगामात या 3 नव्या संघाची होणार ऍन्ट्री?)

फिरकी विभागात जगदीशा सुचित याला किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) तुन दिल्ली संघात ट्रेड करण्यात आले आहे. दिल्लीने रविचंद्रन अश्विन याच्यासह सूचितसह करार करण्याचं निर्णय घेतला आहे. बोल्टने 33 आयपीएल सामन्यांमध्ये 38 बळी घेतले आहेत. यादरम्यान, आयपीएलच्या पुढील आवृत्तीत भारताचा वेगवान गोलंदाज अंकित राजपूत राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. पंजाबकडून खेळलेल्या अंकितला गेल्या हंगामात आयपीएलमध्ये अवघे तीन विकेट घेता आले. 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अंकितने चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही प्रतिनिधित्व केले आहेत. अंकित 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सहभागी झाला आणि त्याने आतापर्यंत 23 आयपीएल सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 14 धावा देऊन पाच विकेट घेतल्या आणि आयपीएलमध्ये पाच विकेट घेणारा एकमेव अनकॅप खेळाडू आहे.

इतकेच नाही तर राजस्थानकडून खेळणार्‍या कृष्णाप्पा गौतम किंग्ज इलेव्हन पंजाब, तर धवल कुलकर्णी याला मुंबई इंडियन्सचे तिकीट मिळाले आहेत.