IPL 2020: आयपीलच्या नव्या हंगामात या 3 नव्या संघाची होणार ऍन्ट्री?
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: IANS)

इंडीयम प्रिमियर लीगच्या अगामी हंगामात लखनऊ, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या नव्या ठिकाणी सामने खेळवण्याचा विचार सरु आहे. त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये काही नवीन संघही सामील होणार आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. आयपीएल 2020 मध्ये सामील होणारे नव्या संघाबाबत पूर्ण माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, यासाठी आयपीएल प्रेमींना नवीन संघाच्याबाबतीत जाणून घ्यायचे असेल तर, त्यांना 2020 च्या हंगमाची वाट पाहावी लागणार आहे.

इंडीयन प्रेमियर लीग ही अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय लीग आहे. परदेशातूनही क्रिकेट चाहते आयपीएलचे सामने पाहण्यासाठी भारतात येतात. अशाच चाहत्यांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. कारण,अगामी आयपीएलमध्ये चाहत्यांना नव्या संघाचे दर्शन होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे अधिक सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल 2020 या हंगमाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मुख्यालयात 8 फ्रेंचाइजीच्या बैठकीत लखनऊ, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या 3 नव्या शहरातील मैदानात सामने खेळवण्यातबाबत चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, आयपीएलच्या या हंगामात लखनऊ, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम या शहरातील संघ सामील होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- India Vs Bangladesh 3rd T20: रोहित शर्मा घालणार 'या' नव्या विक्रमाला गवसणी; भारतीय संघातील एकाही खेळाडूला करता आली नाही अशी कामगिरी

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ लघनऊला आपले दुसरे घरचे मैदान म्हणून पसंती देऊ शकतो. दुसरीकडे राजस्थानचा संघ घरचे मैदान म्हणून अहमदाबादशिवाय गुवाहाटीला प्राधान्य देण्यास इच्छूक आहे. तिरुअनंतपूरम कोणत्या संघ पसंती देईल हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. आयपीएलची गवर्निंग काउंसिल याबाबत सकारात्मक असल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.