IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका, 48 वर्षीय प्रवीण तांबे याच्यावर घातली बंदी, जाणून घ्या कारण
प्रवीण तांबे टी-10 लीगमध्ये (Photo Credits: @T10League/Twitter)

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याची आयपीएल (IPL) टीम कोलकाता नाइट रायडर्सला (Kolkata Knight Riders) मोठा धक्का बसला आहे. यंदाच्या लिलावात खरेदी केलेला अनुभवी खेळाडू 48 वर्षीय प्रवीण तांबे (Pravin Tambe) याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, तो आगामी आयपीएलचा 13 वा सीझन खेळू शकणार नाही. गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 20 लाखांच्या बेस प्राइसमध्ये खरेदी केले होते. आयपीएलच्या लिलावात विकला गेलेला तांबे सर्वात वृद्ध खेळाडूही आहे. आयपीएल 13 चा सर्वात वृद्ध प्रवीणवर मागील वर्षी अबूधाबी आणि शारजाह येथे टी-10 लीगमध्ये भाग घेतल्याच्या कारणाने बंदी घालण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसू शकतो. तांबेने टी-10 लीगमध्ये हॅटट्रिकही घेतली होती. बीसीसीआयचा असा नियम आहे की भारतीय निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये खेळू शकतो. मात्र, तांबेने निवृत्त होण्यापूर्वी विदेशी लीगमध्ये सहभाग घेतल्याने त्याचे आयपीएलमध्ये खेळणे संशयास्पद बनले आहे. (IPL 2020 Final: आयपीएल 2020 फायनलची तारीख जाहीर, सामन्याच्या वेळेत मोठा बदल संभव)

राजस्थान रॉयल्सने 2013 मध्ये प्रवीणचा समावेश केला होता. प्रवीणने 41 वर्षात आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याआधी तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाला नव्हता. त्याच वर्षी तो चॅम्पियन्स टी-20 लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. दरम्यान, शाहरूख खानच्या मालकीचा संघ यंदाच्या हंगामापूर्वी मोठ्या अडचणीत दिसत आहे. पहिले शिवम मावीवर 3 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर नितीश राणा याच्यावर आपले वय लपविण्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाऊ शकते. शिवाय, कमलेश नागरकोटीच्या फिटनेसवरही सतत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. यादरम्यान, या मोसमात प्रवीणचे न खेळणे संघाच्या अडचणीत अजून वाढ करण्यासारखे झाले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 2020 आवृत्ती 24 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर खेळत मोहिमेला सुरुवात करतील, तर फायनल मुंबईमधेच 24 मे रोजी खेळले जाईल. दुसरीकडे, यंदाच्या मोसमात काही मोठे बदलही होण्याची शक्यता आहे. यंदा एका दिवशी 2 सामने होणार नसून ही स्पर्धा 57 दिवस चालेल आणि प्रत्येक सामन्याची सुरुवात साडे सात (7:30) वाजता होईल.