IPL 2020 Schedule of Royal Challengers Bangalore: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जाहीर केले आयपीएल 2020 चे पूर्ण वेळापत्रक; 1 मार्चला खेळला जाईल पहिला सामना
Virat Kohli (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) हा भारतातील लोकांसाठी एखाद्या उत्सवासारखा आहे. दरवर्षीच आयपीएल सीझनची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल ही केवळ भारतच नाही, तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, त्यांचे संपूर्ण वेळापत्रक शेअर केले आहे. शनिवारी त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. यानुसार, आरसीबीचा 31 मार्चला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. संघाचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी 17 मे रोजी होईल.

आयपीएलच्या 13 व्या सीझनमधील पहिला सामना गतविजेत्या मुंबई आणि चेन्नई यांच्यात 29 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मात्र, अद्याप त्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नाही.

याआधी नरायझर्स हैदराबादनेही त्यांचे वेळापत्रक जारी केले आहे. हैद्राबादचा संघ 1 एप्रिल रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर, मुंबई इंडियन्स विरूद्ध आयपीएल 2020 चा आपला सलामीचा सामना खेळेल. यावेळी आयपीएलमध्ये एकूण 62 सामने खेळले जातील. या सीझनमध्ये 29 मार्च, 4 एप्रिल, 5 एप्रिल, 11 एप्रिल, 18 एप्रिल, 19 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल, 2 मे, 3 मे, 9 मे आणि 10 मे रोजी दोन सामने खेळले जातील. मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. (हेही वाचा: सनरायझर्स हैदराबादने जाहीर केले आयपीएल 13 चे संपूर्ण वेळापत्रक; 1 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध होईल पहिला सामना)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संपूर्ण संघ -

विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, देवदत्त पड्डिकल, पार्थिव पटेल, एरन फिंच, जोशुआ फिलिप, शहबाज अहमद, गुरुकीरत सिंह मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मोरिस, इसुरु उडाना, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्ड्सन, डेल स्टेन.