मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: Instagram/mumbaiindians)

यावर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) नवीन हंगामाची तयारी सुरू होताच भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. इतर भारतीय क्रिकेटपटूप्रमाणे मुंबईत रोहितही त्याच्या घरी लॉकडाऊनमुळे कैद होता आणि आता दीर्घ प्रतीक्षेनंतर तो नेटमध्ये गोलंदाजांना सामोरे जाताना दिसला. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे यावर्षी मार्च पासून सर्व क्रिकेट स्पर्धा सक्तीने स्थगित करण्यात आल्या होत्या. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताची वनडे मालिका देखील पुढे ढकलण्यात आली ज्यामुळे दुखापतीनंतर रोहितच्या पुनरागमनाला विलंब झाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फेब्रुवारी महिन्यात टी-20 मालिकेदरम्यान हिटमॅन अखेर झळकला होता. ('19 तारखेला टॉस दरम्यान भेटू' महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर भारताचा उप-कर्णधार रोहित शर्माचे अनोख ट्वीट)

"195 दिवसानंतर अखेर हिटमॅनला ऍक्शनमध्ये परतला. प्रतीक्षा रो-ओवर," रोहितने नेटमध्ये फलंदाजी केल्याच्या व्हिडिओसह मुंबई इंडियन्सने ट्विटर पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले. आयपीएल सुरू होण्यापूर्वी रोहित पुन्हा लयीत परतण्याच्या तयारीत आहे. अनेक महिने न खेळल्यामुळे बहुतेक खेळाडूंसाठी आयपीएल 2020 ही एक कठीण स्पर्धा असणार आहे. सामन्यासाठी फिटनेस मिळवणे आणि सध्याच्या अवांछित ब्रेकनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतल्यावर दुखापती टाळणे आव्हानात्मक असेल.

 

View this post on Instagram

 

195 days since we last saw Hitman in action. The wait is Ro-over 👊💙 . 🔈Sound 🔛 . #OneFamily #IPL2020 @rohitsharma45

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

यंदाच्या सत्रात रोहितचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मोसमात मुंबई इंडियन्स मागील वर्षातील आपले जेतेपद कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतील. स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी मुंबई इंडियन्सचा सामना मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार असल्याचे सध्या समजले जात आहे. रोहितने यापूर्वी एमएस धोनीसाठी एक पोस्ट शेअर करताना याबाबत स्पष्ट केले की 19 सप्टेंबर रोजी मुंबई आणि चेन्नई आमने-सामने येतील. आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या थरारक सामन्यात 1 धावांनी पराभूत करून चौथ्यांदा जेतेपद मिळवले होते.