रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्व बाजूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच भारतीय संघासाठी धोनीने दिलेल्या योगदानाचे स्मरण केले जात आहे. सर्वसामान्यांपासून तर अनेक माजी खेळाडू, राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारपर्यंत धोनीचे चाहते आहेत. दरम्यान, अनेकजण त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. यातच भारतीय क्रिकेट संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2020) पहिल्या सामन्यात नाणेफेकीदरम्यान भेटू असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे. येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीच आयपीएलची स्पर्धा पार पडणार आहे.

धोनी हा आगामी टी-20 विश्वचषकात सहभागी होईल, अशी आशा त्याच्या अनेक चाहत्यांना होती. परंतु, त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. महेंद्र सिंह धोनी हा भारतीय क्रिकेटमधला सर्वात प्रभावशाली व्यक्ती होता. भारतीय संघात आम्हाला त्याची उणीव नेहमी भासत राहिल. एक चांगला संघ कसा तयार करायचा? याची त्याला योग्य माहिती होती. धोनी हा जरी निळ्या जर्सीमधून निवृत्त झाला असेल तरी तो पिवळ्या जर्सीमध्ये आपल्यासोबत राहणार आहे. 19 तारखेला नाणेफेकीदरम्यान भेटू, अशा आशयाचे ट्विट रोहित शर्माने केले आहे. हे देखील वाचा- Chetan Chauhan Passes Away: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचे निधन

रोहित शर्माचे ट्विट-

भारतीय संघात असताना महेंद्र सिंह धोनीने अनेक आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले आहेत. या निर्णयात रोहित शर्माचाही समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार असताना महेंद्र सिंह धोनीने 2013 साली इंग्लंडविरुद्ध मोहाली वन-डे सामन्यात रोहितला सलामीला येण्याची संधी दिली होती. त्यानंतर रोहितने संधीचे सोने करत क्रिडा विश्वात आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे.