भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान (Chetan Chauhan) यांचे आज निधन आहे. चेतन चौहान यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, आज उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे. याबाबत चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी ही माहिती दिली आहे. चेतन चौहान यांच्या निधानाच्या बातमीने ऐकून सर्वांनाच धक्का लागला आहे.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले. मात्र यानंतर चौहान यांना उच्च रक्तदाब आणि किडनीचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. हे देखील वाचा-माजी खासदार सदाशिवराव बापूजी ठाकरे यांचे निधन
एएनआयचे ट्वीट-
Former Indian cricketer and UP Minister Chetan Chauhan passes away at a hospital in Gurugram.
He had tested positive for #COVID19. (File pic) pic.twitter.com/9viVVURezX
— ANI (@ANI) August 16, 2020
चेतन चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकेआहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. चौहान यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये चौहान यांच्या नावावर एकाही शतकाची नोंद नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीने 21 शतके आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या आहेत.