मयंक मार्कंडे (Photo Credit: @MarkandeMayank/Twitter)

इंडियन प्रेमिअर लीग (IPL) 2020 सुरु होण्यास अजून बरेच महिने शिल्लक आहे. पण संघ आत्तापासूनच पुशिलं वर्षी होणाऱ्या 13 व्या हंगामाच्या तयारीला लागले आहे. चार वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांनी आपल्या फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडे (Mayank Markande) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू शेफर्न रुदरफोर्ड (Sherfane Rutherford) यांची ट्रान्सफर विंडो द्वारे अदलाबदली केली आहे. आता आईपीएल 2020 मध्ये रुदरफोर्ड मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसेल. यंदाच्या आयपीएलमध्ये रदरफोर्डने दिल्ली संघासाठी सात सामन्यात 135 च्या स्ट्राईक रेटने 73 धावा केल्या होत्या. (IPL 2020: ट्रेव्हर बेलीस आणि ब्रॅंडन मॅकलम यांची कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रशिक्षक, सल्लागार पदावर नियुक्ती)

मुंबईचा संघ अनेक वर्षांपासून तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी ओळखला जातो. 20 वर्षीय मार्कंडे या यादीमधला एक खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने याआधी हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह, या दोघांनाही भारताकडून सामना जिंकून देण्यासाठी तयार केले आहे. या निर्णयाबद्दल मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी (Akash Ambani) म्हणाले की, "मयंकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मयांक हा प्रतिभावान खेळाडू आहे आणि तो आमच्या संघाचा सदस्य होता, याचा अभिमान आहे. हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु मयांकच्या भल्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो भविष्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार असेल."

रदरफोर्ड याच्या समावेशाबद्दल आकाश अंबानी म्हणाले, "मुंबई इंडिअन्सच्या कुटुंबात प्रतिभावान शेर्फेनचे स्वागत करण्यासाठी मी उत्साही आहे. शेरेफॅनचे अष्टपैलू कौशल्य आणि सामन्या जिंकण्याच्या वृत्तीने आम्हाला प्रभावित केले. त्याने सुरुवातीच्या कारकीर्दीच्या टप्प्यात जगभरातील प्रभावी कारनामे केले आहेत आणि आम्हाला वाटते की त्याला मुंबई इंडियन्स येथे त्याचे घर सापडेल."

यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएल जेता महेंद्र सिंह धोनी याचा चेन्नई सुपर किंग्स संघाचा पराभव केला. आणि चौथ्यांदा आयपील जिंकण्याची रेकॉर्ड कामगिरी केली. मुंबईच्या या विजयात मयांकचाही मोलाचा वाटा आहे.