गौतम गंभीर, ट्रेव्हर बेलीस आणि ब्रेंडन मॅक्कुलम (Photo Credit: Joy Bhattacharjya/Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील तिसरा यशस्वी संघ कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांनी आगामी हंगामासाठी आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल करत इंग्लंडचे विश्वचषक विजेता कोच ट्रेव्हर बेलीस (Trevor Bayliss) यांना आपले मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. इंग्लिश टाइम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्ट नुसार बेलीससह न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि केकेआर खेळाडू ब्रेंडन मॅक्कुलम (Brendon McCullum) याला सल्लागार म्हणून टीममध्ये सहभागी केले गेले आहे. मॅक्कुलम आयपील (IPL) च्या उद्घाटन हंगामात केकेआरसाठी खेळला होता. बेलीस यांच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंड संघाने यंदाचा विश्वचषक जिंक्यचा पराक्रम केलं. हे इंग्लंडचे पहिले विश्वचषक आहे. 2011 ते 2014 दरम्यान बेलीस पूर्वी केकेआरशी संबंधित होते. याच वेळी संघाने दोनदा आयपीएल चा खिताबवर आपले नाव लिहिले.

दुसरीकडे, मॅक्कुलमने केकेआर संघाकडून आयपीलमध्ये पदार्पण केले. सध्या ते कॉमेंट्रीमद्ये व्यस्त आहे. आयपीएलमधील आपल्याच सामन्यात मॅक्कुलमने 158 नाबाद धावा केल्या होत्या.

काही दिवसापूर्वी केकेआरने मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि सहायक प्रशिक्षक सायमन कॅटीच (Simon Katich) यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी केली होती. कॅलिस 2011 पासून नाईट रायडर्स संघात खेळाडू म्हणून सहभागी झाला. त्यानंतर 2015 च्या हंगामानंतर कॅलिसला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमण्यात आले होते.