IPL 2020 Mid-Season Transfer: आयपीएलच्या तेराव्या हंगामात इमरान ताहिर याला संघात जागा नाही? चेन्नई सुपर किंग्जचे सीएओ काशी विश्वनाथन यांनी दिली 'अशी' माहिती
Imran Tahir (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या पार्श्वभूमी भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची (IPL13) स्पर्धा यावर्षी युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील निम्मे सामने खेळले गेले तरीदेखील चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) यशस्वी फिरकी गोलंदात इमरान ताहिर (Imran Tahir) अद्याप एकही सामना खेळला नाही. आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जला अंतिम फेरी गाठण्यात इम्रान ताहिरची महत्वाची भुमिका बजावली होती. या काळात त्याने 17 सामन्यांत 26 विकेट्स घेतले होते. परंतु, यावर्षी त्याला अद्याप संधी मिळाली नाही. मात्र, त्याला संघात संधी का दिली जात नाही? याचे कारण सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी आयपीएल युएईमध्ये होत आहे. येथील परिस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला केवळ दोन परदेशी फलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूंना संघात खेळवण्याची अट आहे. तसेच चेन्नईच्या येत्या पुढील सामन्यात इमरान ताहिर खेळताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना काशी विश्वनाथन म्हणाले की, ताहिरला येत्या सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार आहे. कारण आता येथील धावपट्टीवर बॉलला टर्न मिळेल. सध्याची परिस्थिती पाहता संघ 2 परदेशी फलंदाज आणि 2 परदेशी वेगवान गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याची अट घालण्यात आली आहे. परंतु, दुसऱ्या हाफमध्ये बॉलला टर्न मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर इमरान ताहिर संघात असतील, असे विश्वनाथन म्हणाले आहेत. यामुळे इमरान ताहिर लवकरच संघात दिसेल, तसेच त्याच्या अनुभवाचा चेन्नईच्या संघाला मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- DD Vs RR, IPL 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यावेळी इमरान ताहिर म्हणाला होता की, संघाबाहेर असल्याने सर्व काही संघ संतुलनावर अवलंबून असते. बाहेर बसणे अवघड आहे, परंतु, मला प्रामाणिकपणे म्हणावे लागेल, मी आनंद घेत आहे. तसेच मला संघाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जर संघ चांगली कामगिर करत असेल तर, मी आनंदी आहे. सध्या धावपट्टीवर बॉल फिरण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय युवा प्रतिभेविरूद्ध खेळणे हे एक चांगले आव्हान असेल. अशा आहे की लवकरच मला संघात संधी मिळेल आणि यासाठी मी तयार आहे.