DD Vs RR, IPL 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 30व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयलचा संघ (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 30व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयलचा संघ (Delhi Capitals Vs Rajasthan Royals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहेत. तर, राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधार पद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
या हंगामात दिल्लीचा संघाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. तर, राजस्थान रॉयल्सचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. दिल्लीच्या संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून पाच विजय मिळवले आहेत. तर, दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघाला सातपैकी केवळ 3 सामन्यात विजय मिळवता आले आहेत. यामुळे आजचा सामना राजस्थानच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे देखील वाचा-SRH Vs CSK, IPL 2020: सनरायझर्स हैदराबादच्या हातातून सामना निसटला; चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 20 धावांनी विजय
संघ-
दिल्ली कॅपिटल: श्रेयस अय्यर (कर्णधार), कॅगिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमीयर, डॅनियल सायम्स, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, समृद्ध नॉर्टजे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, केमो पॉल
राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अॅन्ड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमोर, ओशान थॉमस, रायन पराग, यशस्वा जयस्वाल, अनुज रावत, आकाशसिंग, जोफ्रा आर्चर, डेव्हिड मिलर, जोस बटवार, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2020 04:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

