SRH Vs CSK 29th IPL Match 2020: इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL 13) तेराव्या हंगामातील 29 सामन्यात सनरायजर्स चेन्नई विरुद्ध सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 20 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाला 147 धावापर्यंत मजल मारता आली. दरम्यान, केन विल्यमसन याची संयमी खेळी व्यर्थ ठरली आहे.
हैदराबाद विरुद्ध सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने थोडा बदल करून नियमित सलामीवीर फाफ डू प्लेसिससोबत सॅम करनला पाठवण्यात आले होते. मात्र, मैदानात आलेल्या फाफ डू प्लेसिसने अनपेक्षित खेळी केली. आजच्या सामन्यात तो शून्यावरच बाद झाला. त्यानंतर सॅम करनने फटकेबाजी केली. पण त्याला संदीप शर्माने 31 धावांवर बाद केले. त्यानंतर शेन वॉटसन (42) आणि रायडु (41) यांनी डाव सावरत 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डाव सावरण्यासाठी मैदानात आलेल्या महेंद्र सिंह धोनीने 2 चौकार आणि 1 षटकार खेचत मोठी धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, फटकेबाजीच्या प्रयत्नात तो 21 धावांवर बाद झाला. पण रविंद्र जाडेजाने शेवटपर्यंत मैदानात उभे राहून 10 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. यामुळे चेन्नईच्या संघाला 167 धावापर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून संदीप शर्मा, नटराजन आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले. हे देखील वाचा- MS Dhoni Becomes T20 King: स्पोर्ट्स फ्लॅशने केलेल्या सर्वेक्षणात महेंद्रसिंह धोनी ठरला टी-20 चा किंग
ट्वीट-
That is Game, Set and Match!#CSK win by 20 runs to register their third win of #Dream11IPL 2020. pic.twitter.com/2lJM4MKEZj
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2020
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादचा संघ सुरुवातील डगमताना दिसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (9), मनिष पांडे (4), विजय शकंर (12), प्रियम गर्ग (16) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर जॉनी बेरेस्टोने संघाल विजय मिळवूण देण्याचा प्रयत्न केला मात्र, तोदेखील 23 धावावर बाद केले. त्यानंतर केन विल्यमसनने संयमी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन आली. मात्र, त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. त्याने 7 चौकार ठोकत 39 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर राशिद खानने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि हैदराबादच्या संघाला 20 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे.