MS Dhoni of Chennai Super Kings. (Photo Credits: IANS)

Sports Flashes Online Survey: आयपीएलच्या तेराव्या हंगामात महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला सात पैकी केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच संघाचा कर्णधार धोनीची फलंदाजी देखील फॉर्ममध्ये दिसली नाही. यामुळे गेल्या काही दिवसात अनेकजण महेंद्र सिंह धोनीवर टीका करत करत आहेत. मात्र, भारताची पहिली ऑनलाईन स्पोर्ट्स रेडिओ चॅनल स्पोर्ट्स फ्लॅशने केलेल्या एका सर्वेक्षणात महेंद्रसिंह धोनी टी-20 चा किंग ठरला आहे.

स्पोट फ्लॅश हे चॅनल लाईव्ह अपडेट आणि खेळाशी संबंधित प्रसारण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. चॅनलच्या अधिकृत प्रसिद्धीनुसार स्पोर्ट्स फ्लॅशच्या विविध मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वेक्षणात एकूण 12 लाख लोकांनी भाग घेतला होता. या सर्वेक्षणात जगभरातील एकूण 128 क्रिकेटरची निवड करण्यात आली. तसेच विविध टप्प्यात 127 आकर्षित आणि रोमांचक सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेटरांची निवड त्याच्या मागील प्रदर्शनावर आणि सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमिअर लीममध्ये केलेल्या प्रदर्शनावर करण्यात आली. हे सर्वेक्षण स्पोर्ट्स फ्लॅशच्या ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि लिंक्डईन सोशल मीडिया हॅंडलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Happy Birthday Sara Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर झाली 23 वर्षांची! वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला 'हा' सुंदर फोटो

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 29व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय मैदानात सुरु आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जोर लावताना दिसत आहेत. मात्र, या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल? हे सामन्याच्या अखिरेस कळणार आहे.